
कुठलाही सण आला की तुमच्या लाडक्या मालिकांमध्ये तो सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आता लवकरच होळी आहे त्यामुळे आता सर्वत्र होळी स्पेशल कार्यक्रम पाहायला मिळत आहेत.

आता आपली लाडकी मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’मध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहेत.

स्वीटू आणि ओंकारसाठी ही होळी खास असणार आहे.

होळी हा सण नेहमी सगळ्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येणारा सण आहे. आता हा सण स्वीटू आणि ओंकारच्या आयुष्यात काय बदल आणणार हे मालिकेतच कळेल.

मात्र या फोटोवरुन तरी स्वीटू आणि ओंकारनं या होळीला चांगलेच रंग उधळलेले दिसत आहेत.