PHOTO | बॉलिवूड कलाकारच नव्हे तर, ‘हे’ हॉलिवूडकरही ‘किंग खान’चे मोठे चाहते!

1/7
हॉलिवूड अभिनेता ह्यू जॅकमॅन शाहरुख खानचा मोठा चाहता आहे. त्याने एकदा शाहरुख खानकडून नृत्य शिकण्याची इच्छा व्यक्त केली होती.
2/7
‘टायटानिक’ फेम लिओनार्डो डिकॅप्रिओ आणि शाहरुख खान यांच्याशी मार्टिन स्कॉर्से यांनी एका प्रकल्पासाठी करार केला होता. हे तिघे दिग्गज, लेखक पॉल यांच्या 'एक्सट्रीम सिटी' नावाच्या चित्रपटात काम करणार होते. मात्र, दुर्दैवाने हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही.
3/7
पॉपस्टार जेन मलिकने शाहरुख खानचा चित्रपट पाहताना गर्लफ्रेंड गिगी हदीदला प्रपोज केला होता. जेन शाहरुखचा सगळ्यात मोठा चाहता आहे.
4/7
शाहरुख खान हा फक्त हॉलिवूड कलाकारांचाच नाही तर चित्रपट निर्मात्यांचाही मोठा चाहता आहे. शाहरुख एक मोठा सुपरस्टार असल्याचे जेम्स कॅमेरून यांनी म्हटले होते.
5/7
हॉलिवूड अभिनेत्री हैदर ग्रॅहॅमनेही एकदा शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती.
6/7
प्रसिद्ध गायक अकॉनने शाहरुख खानसाठी अनुभव सिन्हा यांच्या ‘रा-वन’ चित्रपटात ‘छम्मक छल्लो’ हे गाणे गायले होते.
7/7
‘ट्वालाईट’ फेम हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट पॅटिनसनने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपट बघत आपण शाहरुखचे चाहते आहोत, असे म्हटले आहे.