
बदलत्या हवामानामुळे त्वचेवर खूप परिणाम होतो. रोज काही गोष्टींची काळजी घेतली आणि नियमित काही गोष्टी त्वचेला लावल्या तर ही समस्या दूर होऊ शकते. चला मग जाणून घेऊया कोणत्या गोष्टी प्रभावी आहेत.

बरेचदा त्वचा जळजळ करते, त्वचेवर पुरळ उठतात. यावर काही घरगुती उपाय उत्तम ठरू शकतात. कोरफड त्वचेसाठी उत्तम आहे. कोरफड लावल्याने अनेक समस्या दूर होतात. त्वचेची जळजळ कमी होते. कोरफड इतकी फायदेशीर आहे की अनेक ब्युटी ब्रॅण्ड्सकडून कोरफड असलेलं एक तरी प्रॉडक्ट बनवलं जातं.

खोबरेल तेल हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे जे टाळूवरील कोरडेपणा आणि चट्टे कमी करण्यास मदत करू शकते. तुम्ही खोबरेल तेल गरम करून लावा त्यानंतर मसाज करा. केस धुण्यापूर्वी काही तास किंवा रात्रभर राहू द्या. असे नियमित केल्यास केसांचे आरोग्य सुधारू शकते आणि कोंडा कमी होतो.

कोमट पाण्यात बेकिंग सोडा टाकून त्याने आंघोळ केली की परिणाम चांगला होऊ शकतो. बेकिंग सोडा मध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी एजंट्स असतात. जर हा सोडा टाकून आंघोळ केलीत तर तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी होऊ शकतात. अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी एजंट्स त्वचेच्या संसर्गाशी लढण्यात मदत करतात.

यामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात ज्यामुळे बुरशीपासून लढण्यास मदत करतात. एका भांड्यात पाणी आणि ऍपल सायडर व्हिनेगरचे समान भागात घेऊन ते टाळूवर लावा. त्यानंतर 15-20 मिनिटे लावून ठेवा. हा कोंडा कमी करण्यात मदत करू शकते.