
पिवळे दात स्वच्छ करण्यासाठी डेंटिस्टकडे जाऊन दातांचे क्लीनिंग करता येते. परंतु प्रत्येक वेळा डेंटिस्टकडे जाणे शक्य नसते. त्यामुळे काही घरगुती उपाय करुन दातांचा पिवळेपणा नाहीसा करता येतो.

पिवळे दात स्वच्छ करण्यासाठी एप्पल सायडर विनेगरचा वापर करता येतो. त्यासाठी दोन चमचे एप्पल सायडर विनेगर एक कप पाण्यात मिसळून माउथवॉश बनवा. त्यानंतर 30 तो घोळ तोंडात ठेऊन ब्रश करुन गुळणे करा. परंतु हे करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पिवळे दात स्वच्छ करण्यासाठी आणखी एक पर्याय आहे. लिंबू, संत्रा आणि केळीच्या सालीचाही वापर करू शकता. यामुळे तुमच्या दातांवर जमा झालेला पिवळा थर साफ होण्यास मदत होऊ शकते.

सालींमध्ये असलेले डी-लिमोनिन किंवा सायट्रिक ऍसिड हे कंपाऊंड तुमचे दात पांढरे करण्यास मदत करते. तुमचे दात स्वच्छ करण्यासाठी, ही साले तुमच्या दातांवर २ मिनिटे हलक्या हाताने घासून घासून घ्या.

ब्रशवर हळद टाकून २ मिनिटे ब्रश करा, त्याचाही तुमच्या दातांना फायदा होईल. ब्रशसंदर्भात काही गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे, जसे की तुम्ही दर ३ महिन्यांनी तुमचा टूथब्रश बदलणे गरजेचे आहे.