
अभिनेत्री पूजा बेदी 11 मे रोजी आपला वाढदिवस साजरा करतेय. पूजा अभिनेता कबीर बेदी यांची मुलगी आहे. पूजा नेहमीच आपल्या कामापेक्षा अधिक वैयक्तिक आयुष्य आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते.

पूजा नेहमीच तिच्या बोल्ड फोटोज आणि अफेअरविषयी चर्चेत असते. मात्र तिला चित्रपटांमधून फार प्रसिद्धी मिळाली नाही. पूजा अजूनही तिच्या स्टाईलनं अनेकांना घायाळ करते.

1991 मध्ये पूजा बेदी एका अडल्ट जाहिरातीमध्ये दिसली होती, त्यावेळीसुद्धा ती बरीच चर्चेत होती. एवढंच नाही तर दूरदर्शननं या जाहिरातीवर बंदी घातली होती, तर इतर वाहिन्यांनी ही जाहिरात दर्शविण्यास नकार दिला होता.

पूजाने आमिर खानसोबत 'जो जीता वही सिकंदर' मधील लिपसिंकची ही बरीच चर्चा होती. तिचा 'विश्कन्या' हा पहिला चित्रपट 1991 मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर ती 'लुटेरे', 'फिर तेरी कहानी याद आए', 'टेरर हाय टेरर' आणि 'शक्ती' या सारख्या चित्रपटांमध्ये दिसली मात्र हे सर्व चित्रपट जवळजवळ फ्लॉप झाले.

फरहान इब्राहिम फर्निचरवाला पासून घटस्फोटानंतर पूजा बेदीनं आपल्या दोन्ही मुलांना वेळ दिला. मात्र 2019 मध्ये पूजा बेदीनं तिचा मित्र उद्योजक मानेक कॉन्ट्रॅक्टरबरोबर आयुष्याचा प्रवास सुरू केला आहे.

आता पूजाची मुलगी अलायानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.