
रसिकांच्या मनावर कायमच राज्य करणाऱ्या श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सध्या ती मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

जान्हवी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. या ट्रिपदरम्यान आपल्या चाहत्यांसाठी ती वेळोवेळी तिचे फोटो शेअर करत आहे.

जान्हवी सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत असून मालदीवमधील तिचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये जान्हवीने स्वीमिंग सूट घातलेला दिसतो आहे

निळ्या रंगाच्या स्वीमसुटमध्ये जान्हवी हॉट दिसत आहे. या फोटोमध्ये मागे सूर्य मावळतीला लागलेला दिसतोय. संध्याकाळ होत असताना तिने हे फोटो काढले आहेत.

सूर्याची किरणं समूद्राच्या पाण्यात मिसळून ते जान्हवीच्या अंगावर सप्तरंगाची उधळण करत असल्याचे या फोटोंमध्ये दिसते आहे. सध्या जान्हवीच्या या फोटोंना तिचे चाहते मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत.