निवडणुकीत फक्त 155 मतं मिळवणाऱ्या अभिनेत्याच्या संपत्तीचा खुलासा

अभिनेता एजाज खान आता बलात्काराच्या आरोपांमुळे पुन्हा वादात सापडला आहे. 'हाऊस अरेस्ट' या कार्यक्रमातील एका 30 वर्षीय स्पर्धक अभिनेत्रीने लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप एजाज खानवर केला आहे.

| Updated on: May 06, 2025 | 10:43 AM
1 / 5
अभिनेता एजाज खान गेल्या दोन दशकांपासून टीव्ही आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम करतोय. त्याने 40 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहे. अभिनयक्षेत्रात काम केल्यानंतर एजाजने राजकारणातही पाऊल ठेवलंय.

2 / 5
एजाजने 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील वर्सोवा मतदारसंघातून नामांकन दाखल केलं होतं. आझाद समाज पार्टीकडून त्याने ही निवडणूक लढवली होती. त्यावेळी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्याने संपत्तीचा खुलासा केला होता.

3 / 5
निवडणूक प्रतिज्ञापत्रात एजाजने त्याची एकूण संपत्ती 41 लाख रुपये असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यापैकी 34 लाख रुपयांची फक्त एक कारच आहे. एजाजचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत, परंतु निवडणुकीत त्याला फक्त 155 मतं मिळाली होती.

4 / 5
उल्लू अॅपवरील वादग्रस्त रिअॅलिटी शो 'हाऊस अरेस्ट'चा निवेदक एजाज खानविरोधात त्याच कार्यक्रमातील एका 30 वर्षीय स्पर्धक अभिनेत्रीने बलात्काराचा आरोप केला आहे. त्याच्याविरोधात चारकोप पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5 / 5
एजाज खान सध्या फरार आहे. दरम्यान हाऊस अरेस्टमधील अश्लील कृत्याप्रकरणी अंबोली पोलिसांनी त्याला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहेत.