या चित्रपटाने ‘धुरंधर 2’लाही टाकलं मागे, पहाटे 3-6 वाजताचे शोज हाऊसफुल; कमाई 2100 कोटींच्या पार

या चित्रपटाने रणवीर सिंहच्या 'धुरंधर 2'लाही मागे टाकलं आहे. तब्बल 1600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 2800 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट कोणता आहे, ते जाणून घ्या..

| Updated on: Mar 30, 2026 | 10:46 AM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहच्या 'धुरंधर 2'ची त्सुनामी पहायला मिळतेय. या चित्रपटाने फक्त 11 दिवसांत 1012.15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरातील कमाईचा आकडा 1300 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. परंतु 'धुरंधर 2'च्या या वादळात एक चित्रपट भारतात हळूहळू आपली पकड मजबूत करताना दिसत आहे.

2 / 5
हा चित्रपट पाहण्यासाठी भारतीय प्रेक्षक पहाटे 3 वाजता आणि 6 वाजताच्या शोसाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. विशेष म्हणजे 'धुरंधर 2'मुळे या चित्रपटाचं भारतातील प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं होतं. 26 मार्च रोजी भारतातील फक्त 5 आयमॅक्स थिएटरमध्ये या चित्रपटाचे शोज होते.

3 / 5
या चित्रपटाचं नाव 'प्रोजेक्ट हेल मेरी' असं असून यामध्ये रायन गोसलिंगची मुख्य भूमिका आहे. पहिल्या दिवशी भारतात या चित्रपटाचे 1324 शोज होते. त्यातून त्याने 2.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवशी 1598 शोजसह 2.90 कोटी रुपयांची कमाई झाली. तिसऱ्या दिवशी 1625 शोजमधून या चित्रपटाने 4.60 कोटी रुपये कमावले.

4 / 5
तर प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी 'प्रोजेक्ट हेल मेरी'ने 4.90 कोटी रुपयांची कमाई केली. या चार दिवसांत भारतातील कमाईचा आकडा 14.65 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या चित्रपटाचा बजेटच तब्बल 1600 कोटी रुपये असून जगभरात त्याने आतापर्यंत 2811.37 कोटी रुपये कमावले आहेत.

5 / 5
'प्रोजेक्ट हेल मेरी' हा चित्रपट 2026 या वर्षातील जगभरातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अँडी वियरने या चित्रपटाची कथा लिहिली असून हा एक सायन्स फिक्शन आहे. ही कथा रायलँड ग्रेस नावाच्या एका माध्यमिक शाळेतील विज्ञानाच्या शिक्षकाभोवती फिरते. या चित्रपटात रायन गोसलिंग, सँड्रा ह्युलर, जेम्स ऑर्टिझ आणि लायनेल बॉइज यांच्या भूमिका आहेत.

Follow Us