
प्रेम ही वैश्विक संकल्पना आहे. या जगात तुम्ही कुठेजरी गेले तरी तुम्हाला एकमेकांवर प्रेम करणारे लोक सापडतातच. प्रेम ही भावना वैश्विक असली तरी या भावनेला सांगण्यासाठी वेगवेगळी भाषा वापरली जाते.

त्या-त्या प्रदेशातील भाषांचा वापर करूनच अनेकजण आपलं प्रेम व्यक्त करतात. बांगलादेश हा कधीकाळी भारताचाच भाग होता. परंतु या दोन्ही देशांमध्ये वेगवेगळी भाषा बोलली जाते.

बांगलादेशात बांगला भाषेला अधिकृत भाषा म्हणून दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे बांगलादेशातील तरुण, तरुणी एकमेकांवर असलेले प्रेम कशा पद्धतीने व्यक्त करतात ते जाणून घेऊ या..

बांगलादेशात बांगला भाषेतच प्रपोज केले जाते. त्यासाठी आय लव्ह यू म्हणण्याऐवजी 'आमी तोमाके भालोबाशी' असे म्हटले जाते. या शब्दांचा अर्थ मी तुझ्यावर प्रेम करतो, असा होतो.

एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम करत असल्याचे सांगायचे असल्यास 'आमी तोमाके खूब भालोबाशी' असे म्हटले जाते. या वाक्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगायचा झाल्यास, आमी म्हणजेच मी, तोमाके म्हणजेच तुझ्यावर आणि भालोबाशी म्हणजेच प्रेम करतो, असा त्याचा अर्थ होतो.