GK : सोनं कॅरेट आणि चांदी किलोमध्ये का मोजली जाते? जाणून घ्या

सोन्याचे मोजमाप हे नेहमी कॅरेटमध्ये केले जाते. सोनं जेवढ्या जास्त कॅरेटचं असतं, तेवढीच जास्त त्या सोन्याची शुद्धता असते. तर चांदी ही किलोमध्ये मोजली जाते.

| Updated on: Feb 22, 2026 | 12:31 AM
1 / 5
सोने आणि चांदी हे दोन्ही खूपच मौल्यवान धातू आहेत. परंतु या धातूंच्या मापनपद्धती वेगेवगळ्या आहेत. या दोन्ही धातूंचे मोजमाप करण्यासाठी दोन वेगवेगळ्या पद्धती का आहेत, हे जाणून घेऊ या..

सोने आणि चांदी हे दोन्ही खूपच मौल्यवान धातू आहेत. परंतु या धातूंच्या मापनपद्धती वेगेवगळ्या आहेत. या दोन्ही धातूंचे मोजमाप करण्यासाठी दोन वेगवेगळ्या पद्धती का आहेत, हे जाणून घेऊ या..

2 / 5

सोन्याचे मोजमाप हे नेहमी कॅरेटमध्ये केले जाते. सोनं जेवढ्या जास्त कॅरेटचं असतं, तेवढीच जास्त त्या सोन्याची शुद्धता असते. तर चांदी ही किलोमध्ये मोजली जाते. यामागे व्यापार, परंपरा, आंतरराष्ट्रीय मानके अशी वेगवेगळी कारणे आहेत.

3 / 5

24 कॅरेटचे सोने जवळपास 99.9 टक्के शुद्ध असते. म्हणजे सर्वात शुद्ध सोने हे 24 कॅरेटचे असते. सोने हा धातू नरम असतो. त्यामुळे दागिने तयार करताना त्यात तांबे, चांदी मिसळले जाते. 22 कॅरेट सोन्यामध्ये साधारण 91.67 टक्के भाग हा शुद्ध सोने असते.

4 / 5

18 कॅरेट सोन्याची शुद्धता ही 75 टक्के असते. चांदीची सुद्धता ही टंचमध्ये सांगितली जाते. 99.9 टंच म्हणजेच चांदी 99.9 टक्के शुद्ध असते. 92.5 टंच शुद्ध चांदी म्हणजे 92.5 टक्के शुद्ध चांदी.

5 / 5

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us