
प्रत्येकालाच आईस्क्रीम खायला आवडते. आजकाल आईसक्रीमचे वेगवेगळे फ्लेवर मिळतात. 100 रुपयांपासून ते कित्येक हजार रुपयांपर्यंतची आईसक्रीम तुम्हाला मिळू शकते. संपूर्ण जगात आईसक्रीम हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो.

आजकाल आईसक्रीम खाण्याचे प्रमाण जास्तच वाढलेले आहे. त्यामुळे अनेकांना वाटते की हा खाद्यपदार्थ नवा आहे. त्याची निर्मिती गेल्या काही वर्षांपूर्वीच झाली असावी. परंतु सत्य मात्र वेगळेच आहे. आईसक्रीमची निर्मिती खूप अगोदरच झालेली आहे.

साधारण 200 इ. स पूर्वी लोक दूध आणि तांदळाचे मिश्रण असलेला एक पदार्थ आवडीने खायचे. त्याला अगोदर थंड केलं जायचं. त्यामुळे तो आजकालच्या आईसक्रीमप्रमाणेच वाटायचा. जुन्या काळात ग्रीस आणि रोममध्ये लोक अशा प्रकारचे खाद्यपदार्थ खूप महाग होते.

असे खाद्यपदार्थ खायला असणे तेव्हा प्रतिष्ठेचे मानले जायचे. 13 व्या शतकात मार्को पोलो नवाच्या व्यक्तीने चीनमधून दुधाच्या डेझर्टचे प्रकार इटलीला आणले. त्यानंतर हा खाद्यपदार्थ हळूहळू संपूर्ण युरोपमध्ये पसरला आणि आवडीने खाल्ला जाऊ लागला.

1600 व्या शतकापासून आईस्क्रीम सामान्य लोकांसाठी उपलब्ध होऊ लागली. त्यानंतर बऱ्याच वर्षाांनी म्हणजेच 1851 साली जॅकब फुसेल या व्यक्तीने यूकेमध्ये जगातील पहिला आईस्क्रीमचा कारखाना चालू केला आणि तेव्हापासून आईस्क्रीम हा खाद्यपदार्थ संपूर्ण जगात पोहोचला. (टीप- या लेखातील माहिती प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.)