दारु शरीरातून संपूर्णपणे बाहेर पडण्यासाठी किती वेळ लागतो ? वाचाल तर आश्चर्यचकीत व्हाल…

दारु प्यायलेल्या व्यक्तीच्या श्वासांना,लघवीला आणि घामालाही वित्रित घाणेरडा वास येत असतो. त्यामुळे दारु पोटात गेली तर नेमकी किती तासांनंतर माणूस नॉर्मल होतो हे पाहणे महत्वाचे आहे.

| Updated on: Feb 13, 2026 | 11:01 PM
1 / 6
दारु म्हणजे प्यायल्यानंतर पोट आणि लहान आतड्यांमधून रक्तप्रवाहात जाते आणि नंतर संपूर्ण शरीरात पसरते. दारुचे (अल्कोहोल) प्रामुख्याने यकृतात पचन होते. तर काही प्रमाणात ती मूत्र, घाम आणि श्वासाद्वारे उत्सर्जित होते.

2 / 6
रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण (BAC) हे सर्वसाधारणपणे दारु प्यायल्यानंतर 30 ते 90 मिनिटांत त्याच्या सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचते.प्यायलेल्या अल्कोहोल पैकी 90 टक्क्यांहून अधिक अल्कोहोल यकृतामध्ये ऑक्सिडायझेशन होते.  ते प्रथम एसीटेटमध्ये आणि शेवटी कार्बन डायऑक्साइड (CO₂) आणि पाण्यात रूपांतरित होते. केवळ 2 ते 5 टक्के अल्कोहोल मूत्र, घाम किंवा श्वासाद्वारे अपरिवर्तित स्वरूपात उत्सर्जित होते. म्हणजेच, अल्कोहोल काढून टाकण्याच्या प्रक्रियेत यकृताची भूमिका सर्वात महत्वाची असते.

3 / 6
यकृताची अल्कोहोल पचवण्याची क्षमता मर्यादित असते.यकृताला एक युनिट अल्कोहोल विघटित करण्यासाठी साधारणपणे १ ते २ तास लागतात. एक मानक युनिट (  ३३० मिली बिअर - ५ टक्के अल्कोहोल ) , ( १५० मिली वाईन - १२ टक्के अल्कोहोल ) किंवा (  ४५ मिली स्पिरिट्स -  ४० टक्के अल्कोहोल ) समतुल्य आहे.

4 / 6
 उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने काही तासांत ३ ते ४ युनिट अल्कोहोल प्यायल्यानंतर दारू पिणे थांबवल्यानंतर ३ ते ६ तासांत रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण जवळजवळ शून्यावर येऊ शकते. मात्र, चाचणीची पद्धती आणि व्यक्तीच्या शारीरिक क्षमतेनुसार, काही तासांनंतरही अल्कोहोलचे अंश शरीरात आढळू शकतात.

5 / 6
जर एखाद्या व्यक्तीने ८ ते १० युनिट्स इतके जास्त प्रमाणात अल्कोहोल प्यायले तर रक्तातील अल्कोहोलची पातळी शून्यावर येण्यासाठी १२ ते २४ तास देखील लागू शकतात. काही स्थितीत, हा कालावधी २४ तासांपेक्षा जास्त असू शकतो

6 / 6
अनेकांना वाटते की कॉफी प्यायल्याने,थंड पाण्याने आंघोळ केल्याने किंवा जास्त प्रमाणात जेवणामुळे अल्कोहोल लवकरच पोटातून बाहेर पडते. परंतू प्रत्यक्षात तसे होत नाही.अल्कोहोल शरीरातून संपूर्ण टाकण्याची प्रक्रिया पूर्णपणे आणि यकृताच्या चयापचय क्षमतेवर अवलंबून असते असे  अमेरिकेच्या आरोग्य वेबसाईट हेल्थलाईनने म्हटले आहे.

Follow Us