दारूचीही एक्सपायरी डेट असते, बाटलीचे झाकण उघडल्यानंतर किती दिवसात प्यावी?

दारूची एक्सपायरी डेट तिच्यातील अल्कोहोलच्या प्रमाणावर अवलंबून असते. व्हिस्की, व्होडका, रम सारख्या उच्च अल्कोहोलयुक्त दारूंची एक्सपायरी होत नाही, परंतु वाइन आणि बियर लवकर खराब होतात.

| Updated on: Jul 29, 2025 | 11:10 PM
1 / 13
आपण अनेकदा ऐकतो की दारु जितकी जुनी होते, तितकीच त्याची चव वाढत जाते. तुम्हीही दारुचे शौकिन असाल तर तुम्हाला दारुची एक्सपायरी डेट काय असते, किती असते याबद्दल जाणून घेणे खरंच गरजेचे आहे.

2 / 13
कॉकटेल इंडियाचे संस्थापक संजय घोष यांना दादा बारटेंडर म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या मते व्होडका, व्हिस्की, टकीला आणि रम यांसारख्या स्पिरिट प्रकारातील दारु कधीच एक्स्पायर होत नाही.

3 / 13
जर त्यांच्या बाटल्या सीलबंद असतील आणि त्या जर तुम्ही योग्य प्रकारे साठवल्या असतील, तर अनेक वर्षांनंतरही पिण्यायोग्य राहतात.  पण, वाइन आणि बिअर या दारु एक्स्पायर होणाऱ्या दारूच्या श्रेणीत मोडतात.

4 / 13
दारू एक्स्पायर होण्याचं किंवा न होण्याचं मुख्य कारण हे त्यातील अल्कोहोलचं प्रमाण असते. वाइन आणि बिअरमध्ये अल्कोहोलचं प्रमाण खूप कमी असतं. वाइनमध्ये साधारण 15 टक्के आणि बिअरमध्ये 4 ते 8 टक्के अल्कोहोल असतं. या प्रमाणामुळेच त्या लवकर एक्सपायर होतात.

5 / 13
याउलट टकीला, व्होडका आणि व्हिस्की यांसारख्या दारूंमध्ये अल्कोहोलचं प्रमाण खूप जास्त असतं. यामुळे त्या अनेक वर्षं टिकून राहतात. त्यांच्या चवीतही विशेष फरक पडत नाही.

6 / 13
वाइनच्या बाटलीत फक्त 15 टक्के अल्कोहोल असतं. भारतात वाइनची बाटली साधारणपणे 5 वर्षांपर्यंत चांगली राहते.  पण जर तुम्ही वाइनची बाटली उघडली, तर ती फक्त 5 ते 6 दिवसांत खराब होते.

7 / 13
दुसरीकडे जर बिअरची बाटली काही तास उघडी राहिली, तर तिची चव बिघडायला लागते. ती पूर्णपणे खराब होते. बिअरमध्ये ऑक्सिडायझेशनची समस्या असते, कारण त्यात अल्कोहोलचं प्रमाण कमी असतं. यामुळे बिअर खूप लवकर हवेच्या संपर्कात येऊन खराब होते.

8 / 13
वाईन आणि बिअरचं झाकण उघडल्यावर त्या लवकर खराब होतात, पण व्हिस्की, रम, जिन, व्होडका आणि टकीला यांच्याबाबतीत मात्र असं नाही. तुम्ही उघडलेल्या बाटलीतूनही या प्रकारची दारू पिऊ शकता.

9 / 13
या दारु कधीच खराब होत नाहीत पण काही कालावधीनंतर त्यांच्या चवीत थोडा फरक येऊ शकतो. जर तुम्ही व्हिस्की, रम, जिन किंवा व्होडकाची बाटली उघडली असेल तर वेळेनुसार तिचा फ्लेवर कमी होऊ लागतो.

10 / 13
त्यामुळे, बाटली उघडल्यानंतर ही दारू जास्तीत जास्त एक वर्षाच्या आत वापरावी. व्हिस्की किंवा इतर दारुची बाटली अर्धी भरलेली आणि अर्धी रिकामी असेल तर त्यातील दारू ऑक्सिडाइज होते, ज्याचा परिणाम त्याच्या चवीवर होतो.

11 / 13
काही व्हिस्की खूप जुन्या असतात आणि त्यांची किंमतही जास्त असते. याला 'एज्ड व्हिस्की' म्हणतात. ही व्हिस्की अनेक वर्षं लाकडी पिंपामध्ये ठेवली जाते. त्यामुळे तिला एक विशिष्ट आणि उत्कृष्ट चव मिळते.

12 / 13
जर तुम्हाला दारु साठवायची असेल तर ती नेहमी थंड आणि अंधार असलेल्या ठिकाणी ठेवावी. यामुळे तिची गुणवत्ता अधिक काळ टिकून राहते.

13 / 13
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)