
LPG Invention : इराण-इस्त्रायल युद्धामुळे जगात उर्जासंकट निर्माण झाले आहे. या युद्धामुळे भारतात गॅस सिलिंडरचा भाव वाढला आहे. सोबतच भविष्यात पेट्रोल, डिझेलचाही भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, इराण-इस्रायल युद्धामुळे लोकांना घरगुती गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नाहीये. देशभरात गॅस सिलिंडरसाठी लोकांनी रांगा लावल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर स्वयंपाक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसची निर्मिती कशी झाली, त्याचा शोध कोणी लावला हे जाणून घेऊ या...

1900 च्या दशकात पेट्रोलची साठवणूक हे इंधन विक्रेत्यांपुढील मोठे आव्हान होते. इंधनाची वाहतूक, साठवणूक करताना त्याचे बाष्पीभवन व्हायचे. यामुळे सुरक्षेचाही मुद्दा उपस्थित झाला होता. पुढे अभ्यासानंतर 1910 साली पेट्रोलचे बाप्षीभवन का होते? याचा शोध वॉल्टर स्नेलिंग यांनी लावला.

पेट्रोलमध्ये प्रोपेन आणि ब्युटेन असे दोन घटक असतात, हे स्नेलिंग यांना समजले. सामान्य तापमानात पेट्रोलचे बाष्पीभवन होते. त्याच वेळी हे दोन्ही घटक पेट्रोलमधून वेगळे होतात. परिणामी पेट्रोलचे बाष्पीभवन होते. पेट्रोलमधून निघणाऱ्या याच बाष्पाला गोळा करून स्नेलिंग यांनी एक वेगळे इंधन म्हणून वापरण्याचा पर्याय समोर ठेवला.

प्रोपेन आणि ब्युटेन या दोन्ही वायूंना कॉम्प्रेस करून त्यांना द्रवरुपात आणण्यात स्नेलिंग यांना यश आले. याच आज आपण लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजेच एलपीजी म्हणतो. आज याच एलपीजीचा अन्न शिजवण्यासाठी उपयोग केला जातो. 1912 साली एलपीजीचा इंधन म्हणून पहिल्यांदाचा वापर झाला.