
आयुर्वेदानुसार उरलेले किंवा शिळे अन्न खाणे हे शरीराच्या आरोग्यासाठी योग्य मानले जात नाही. कारण त्याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. विशेषतः आदल्या रात्रीचे उरलेले अन्न सकाळी किंवा आदल्या दिवशीचे उरलेले अन्न रात्री खाल्ल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात.

आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की अन्न वाया घालवू नये. यामुळे अनेक लोक अन्न फेकून देण्याऐवजी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात. दुसऱ्यादिवशी गरम करून खातात. आधुनिक विज्ञान काही प्रमाणात उरलेले अन्न योग्यरित्या साठवून खाण्याची परवानगी देते. पण आयुर्वेद शास्त्राचा याबद्दल वेगळा दृष्टिकोन ठेवते.

ताजे तयार केलेले अन्न शरीराला आवश्यक पोषण आणि ऊर्जा देते. याउलट, शिळे किंवा साठवलेले अन्न खाल्ल्याने त्यातील पौष्टिक मूल्य गायब होते.

यामुळे तुम्ही निरोगी राहण्याऐवजी जाड आणि आळशी होता. आयुर्वेदानुसार, अन्न शिजवल्यानंतर फक्त १ ते ३ तास ताजे आणि फायदेशीर राहते, म्हणून त्या वेळेत ते खाणे सर्वोत्तम मानले जाते.

आयुर्वेद उरलेले अन्न न खाण्याची तीन प्रमुख कारणे स्पष्ट करतो. जी शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेवर आणि संपूर्ण आरोग्यावर आधारित आहेत. आयुर्वेदात वात, पित्त आणि कफ असे तीन दोष नमूद केले आहे.

या तीन दोषांपैकी, वात दोष हा प्रामुख्याने पचन प्रक्रियेशी संबंधित आहे. जेव्हा शिळे किंवा दीर्घकाळ साठवलेले अन्न खाल्ले जाते, तेव्हा ते शरीरातील वात दोषात असंतुलन निर्माण करू शकते. यामुळे पचन समस्या, गॅस, पोट फुगणे, अपचन आणि बद्धकोष्ठता वाढू शकतात. शिळे अन्न पचायला जड असते, ज्यामुळे पचनशक्तीवर ताण येतो.

आयुर्वेदानुसार अन्न शिजवल्यानंतर कालांतराने त्यातील पोषक तत्वे हळूहळू नष्ट होतात. दीर्घकाळ साठवलेले अन्न शरीराला पुरेसे पोषण देऊ शकत नाही. ते खाल्ल्याने शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत नाही.

महत्त्वाची बाब म्हणजे शिळे अन्न खाल्ल्याने शरीरात आमा (Aama) नावाचे टॉक्सिन पदार्थ तयार होतात. यामुळे अन्नाचे पचन होण्यास अडचणी येतात. हे अनेक रोगांचे मूळ कारण बनतात.

त्यामुळे स्वयंपाक केल्यानंतर एका तासाच्या आत अन्न सेवन करण्याचा सल्ला देतो, जेणेकरून शरीराला त्याचे संपूर्ण पोषण आणि ऊर्जा मिळू शकेल. तसेच कोणत्याही प्रकारच्या पचन समस्या किंवा दोषांचे असंतुलन यामुळे टाळता येईल.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)