पाकिस्तानी एजंट ज्योती मल्होत्रा महिन्याला किती पैसे कमावयची?

पाकिस्तानी जासूस यूट्यूबर ज्योती मल्होत्रा सध्या चर्चेत आहे. तिला भारतीय गुप्तचर यंत्रणांनी तिला ताब्यात घेतले आहे. ती महिन्याला किती पैसे कमावते हे तुम्हाला माहिती आहे का?

| Updated on: May 18, 2025 | 1:49 PM
1 / 5
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असलेली हरियाणातील प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. गुप्तचर सूत्रांनुसार, ज्योती मल्होत्रावर पाकिस्तानी गुप्तचर एजंट्सला संवेदनशील माहिती पुरवल्याचा गंभीर आरोप आहे. या सगळ्यातून ती महिन्याला किती पैसे कमावयची चला जाणून घेऊया...

2 / 5
ज्योती मल्होत्रा यूट्यूब आणि सोशल मीडियावरून चांगली कमाई करत होती. तिच्या यूट्यूब चॅनलवर 3.77 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. इंस्टाग्रामवरही तिचे 1.31 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ट्रॅव्हल व्लॉगर म्हणून तिच्याकडे कमाईची अनेक माध्यमं होती.

3 / 5
ज्योतीची कमाई मुख्यतः यूट्यूबवरील जाहिरातींमधून होत असे. यूट्यूबवर प्रत्येक 1,000 व्ह्यूजसाठी साधारणपणे 1 ते 3 डॉलर (80 ते 240 रुपये) इतकी कमाई होऊ शकते. जर ज्योतीच्या प्रत्येक व्हिडिओला सरासरी 50,000 व्ह्यूज मिळत असतील आणि ती महिन्याला 10 व्हिडिओ पोस्ट करत असेल, तर तिचे मासिक व्ह्यूज सुमारे 5 लाखांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे यूट्यूबवरून तिची मासिक कमाई सुमारे 40,000 रुपये ते 1,20,000 रुपयांदरम्यान असू शकते.

4 / 5
ज्योतीचे वडील हरीश मल्होत्रा यांनी सांगितले की, 2020 पूर्वी ती दिल्लीत एका छोट्या संस्थेत नोकरी करायची, जिथे तिला फक्त 20 हजार रुपये पगार मिळायचा. तरीही ती 12 हजार रुपये भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहून ऐषोआरामाचे जीवन जगायची. त्या वेळी तिच्या फ्लॅटचे वीज बिलच चार ते पाच हजार रुपये यायचे. एवढ्या कमी पगारातही ती अनेकदा मोठमोठ्या हॉटेलांमध्ये जायची.

5 / 5
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय गुप्तचर यंत्रणा खूप सक्रिय होत्या. सूत्रांनुसार, याच दरम्यान एक संदेश ट्रॅप झाला होता. हा संदेश हिसारमधून पाकिस्तानला पाठवला गेला होता. या संदेशाच्या डंपचा पाठपुरावा करत लष्करी गुप्तचर यंत्रणा ज्योती मल्होत्राच्या घरी पोहोचली आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिला ताब्यात घेतले. त्या वेळी ज्योतीच्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहून स्थानिक पोलिसांना ती पाकिस्तानी जासूस असल्याचा विश्वासच बसत नव्हता, पण तिच्या मोबाइलमधील कॉल डिटेल्स, फोटो-व्हिडिओ, स्नॅपचॅट आणि टेलिग्रामवरील चॅटिंग पाहून पोलिसांचीही झोप उडाली.