GK : एका किलोमीटरसाठी रेल्वे इंजिन किती डिझेल पिते? उत्तर वाचून हैराण व्हाल
Indian Railways : भारतात लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी ट्रेन हा सर्वात सोपा आणि सोयीस्कर पर्याय मानला जातो. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. आज आपण ट्रेनच्या मायलेजबाबत माहिती जाणून घेऊयात.

डिझेल इंजिनचे इंधन : हजारो प्रवाशांना घेऊन हजारो किलोमीटरचा प्रवास करणारी ट्रेन 1 लिटर इंधनात किती किलोमीटर धावते, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

अनेक ठिकाणी अजूनही डिझेल इंजिनचा वापर : भारतीय रेल्वे वेगाने आधुनिकीकरण करत आहे. आता बहुतांश ठिकाणी इलेक्ट्रिक इंजिनचा वापर केला जातो. मात्र अजूनही अनेक मार्गांवर डिझेल इंजिन असलेल्या ट्रेन धावताना दिसतात.

प्रत्येक ट्रेनचे मायलेज वेगळे : भारतात लोकल, एक्सप्रेस, सुपरफास्ट आणि मालगाडीसह विविध प्रकारच्या ट्रेन धावतात. ट्रेनचे मायलेज तिच्या प्रकारावर अवलंबून असते. त्यामुळे सर्व ट्रेनचे मायलेज एकसारखे नसते.

ट्रेनच्या फ्यूल टँकची क्षमता : रिपोर्टनुसार, ट्रेनच्या फ्यूल टँकचा आकार साधारण 10x10 असतो. त्यामध्ये एकावेळी सुमारे 61 हजार लिटर इंधन साठवता येते.

ट्रेनचे मायलेज : सामान्यतः 12 डब्यांच्या पॅसेंजर ट्रेनला 1 किलोमीटर धावण्यासाठी सुमारे 6 लिटर डिझेल लागते. तर 24 डब्यांच्या सुपरफास्ट ट्रेनलाही 1 किलोमीटर धावण्यासाठी सुमारे 6 लिटर इंधन लागते. तर 12 डब्यांची एक्सप्रेस ट्रेन सुमारे 4.5 लिटर इंधनात 1 किलोमीटर अंतर पार करते.