रोज कमीतकमी ‘इतके’ ग्लास पाणी प्या, आरोग्याच्या ‘या’ 4 समस्या टळतील!

निरोगी आयुष्यासाठी चांगल्या आहारासोबतच भरपूर पाणी प्यावं. पाणी भरपूर प्या असं सांगितलं जातं. किती पाणी प्यायला हवं असेही सल्ले हमखास दिले जातात. "पाणी प्यायल्याने अनेक आजार दूर होतात" पण हे नेमके कोणते आजार असतात? कोणते आजार पाणी प्यायल्याने खरंच दूर होतात? किती पाणी प्यावं? बघुयात...

| Updated on: Oct 08, 2023 | 10:47 AM
1 / 5
आरोग्यतज्ञांकडून योग्य प्रमाणात पाणी प्यायचा सल्ला दिला जातो. निरोगी आयुष्यासाठी सकस आहारासोबत भरपूर पाणी पिणेही तितकेच महत्त्वाचे असते. भरपूर पाणी पित असाल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर पण दिसतो.

2 / 5
यकृत आणि मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्या. मूत्रपिंडाचे तर अनेक आजार जास्त पाणी प्यायल्याने दूर होतात. यकृत आणि मूत्रपिंड पाण्याच्या कमतरतेमुळे खराब होतात. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी प्या.

3 / 5
शरीर डिटॉक्स करण्याचे अनेक मार्ग आहेत. बरेच उपवास सुद्धा डिटॉक्स होण्यासाठी केले जातात, मॉडर्न उपवास असं आपण म्हणू शकतो. भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातले विषारी पदार्थ बाहेर पडतात, यालाच शरीर डिटॉक्सीफाय करणं म्हणतात. आरोग्याच्या अनेक समस्या टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या.

4 / 5
पचनक्रिया, बद्धकोष्ठता, पोटाशी संबंधित आजार असतील तर भरपूर पाणी प्यायल्याने या समस्या सुटतील. कमीतकमी ५ मोठे ग्लास पाणी प्यावं. पाण्याने पोटाशी संबंधित आजार दूर होतात. पुरेशा प्रमाणात पाणी प्या आणि या आजारांपासून लांब राहा.

5 / 5
पाण्याची कमतरता अनेक समस्या निर्माण करते. पाणी कमी असण्याला डिहायड्रेशन होणे असं म्हणतात. पाणी कमी पडलं की त्वचा निस्तेज दिसते. रोज कमीतकमी ५ ग्लास पाणी प्यायला हवं. पाणी योग्य प्रमाणात प्यायल्यास काय होतं ते बघुयात...