India Women Asia Cup 2026 : आशियाई चॅम्पियन बनलेला भारतीय महिला संघ मालामाल; कोणाला किती रक्कम मिळाली?
Womens Asia Cup 2026 Prize Money : भारताने महिला आशिया चषक २०२६ च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा ७२ धावांनी पराभव करत आठव्यांदा विजेतेपद पटकावलं. या विजयात फलंदाजांसोबतच गोलंदाजांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.

महिला आशिया कप 2026 च्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेचा 72 धावांनी पराभव करत विक्रमी 8 व्यांदा आशिया चॅम्पियन होण्याचा मान मिळवला.
अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी, विजेत्या भारतीय संघाला सुमारे 25,000 अमेरिकन डॉलर (जवळपास 21 लाख रुपये) तर उपविजेत्या श्रीलंका संघाला 15,000 डॉलर (सुमारे 12.5 लाख रुपये) मिळण्याची शक्यता आहे.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने कर्णधार म्हणून चौथे आशिया कप विजेतेपद पटकावत माजी कर्णधार मिताली राज (3 वेळा विजेती) यांचा विक्रम मोडीत काढला.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 183 धावांचा डोंगर उभारला; प्रत्युत्तरात 184 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पूर्ण संघ अवघ्या 111 धावांवर गडगडला.
भारताकडून श्री चरणीने घातक गोलंदाजी करत सर्वाधिक 4 बळी टिपले, तर दीप्ती शर्माने 3 बळी घेत भारताच्या एकतर्फी विजयात मोठी भूमिका बजावली.