जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार, पॅनकार्डचे काय करावे?

प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर, त्यांची महत्त्वाची कागदपत्रे जसे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्र सुरक्षित करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आणि प्रक्रिया या लेखात सविस्तरपणे वर्णन केली आहेत.

| Updated on: Sep 19, 2025 | 4:20 PM
1 / 6
आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांचे काय करायचे, हा प्रश्न कायमच उपस्थित केला जातो. या कागदपत्रांचा गैरवापर टाळण्यासाठी ते बंद करणे गरजेचे असते. जर तुम्हालाही एखाद्या मृत व्यक्तीचे कागदपत्र बंद करायचे असतील, तर त्यासाठी काय करावे, याबद्दलची माहिती आपण जाऊन घेऊया.

2 / 6
आधार कार्ड पूर्णपणे रद्द करण्याचा कोणताही अधिकृत मार्ग नाही. मात्र, त्याचा गैरवापर टाळण्यासाठी तुम्ही ते लॉक करू शकता. यासाठी तुम्ही UIDAI (Unique Identification Authority of India) ला संपर्क साधा. मृत व्यक्तीच्या मृत्यूची माहिती देऊन त्यांचा आधार आयडी लॉक करण्याची विनंती करा.

3 / 6
तसेच तुम्ही तुमच्या जवळच्या आधार केंद्राला भेट देऊनही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. यामुळे त्या आधार कार्डचा उपयोग कोणत्याही नवीन व्यवहारासाठी होणार नाही. तसेच गैरव्यवहार थांबतील.

4 / 6
मृत व्यक्तीच्या पॅन कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी तुम्ही ते ब्लॉक करू शकता. यासाठी आयकर विभागाशी (Income Tax Department) संपर्क साधा. यासाठी तुम्हाला मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र आणि आधार कार्डची आवश्यकता असेल. हे कागदपत्र घेऊन आयकर विभागाकडे जा. त्यांना पॅन कोड देऊन तो ब्लॉक करण्याची विनंती करा. त्यांनी ब्लॉक केल्यानंतर तुम्हाला काळजी करण्याची गरज भासणार नाही.

5 / 6
मतदार ओळखपत्राचा गैरवापर टाळण्यासाठी तुम्ही ते रद्द करू शकता. यासाठी निवडणूक आयोगाशी (Election Commission) संपर्क साधा. त्यांच्या कार्यालयात जाऊन फॉर्म ७ भरून मतदार ओळखपत्र रद्द करण्याची विनंती करा. यासाठी तुम्हाला मृत व्यक्तीच्या मृत्यू प्रमाणपत्राची, आधार कार्डची आणि पॅन कार्डची छायांकित प्रत सोबत असणे आवश्यक आहे.

6 / 6
आजकाल आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. मृत व्यक्तीच्या कागदपत्रांचा वापर करून कर्ज घेणे, बँक खाती उघडणे किंवा इतर गैरव्यवहार होण्याची शक्यता असते. यामुळे, तुमच्या नातेवाईकांचे किंवा प्रिय व्यक्तींचे महत्त्वाचे दस्तऐवज योग्य वेळी निष्क्रिय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.