घरातली ही सिक्रेट गोष्ट म्हणजे पालींचा सर्वात मोठा शत्रू, दिसताच घरातून काढतात पळ; 99 टक्के लोकांना माहितीच नाही!
पाल हा सरपटणारा प्राणी पाहून अनेकांना भीती वाटते. काही महिला तर थेट पळ काढतात. परंतु एकही रुपया खर्च न करता तुम्ही पालींना घरातून हाकलून लावू शकता. हे कसे शक्य आहे, ते जाणून घ्या...

पाल हा सरपटणारा प्राणी पाहिल्यावर अनेकजण घाबरतात. घरातील महिला तर पालीला पाहिले की लगेच पळून जातात. तुमच्या घरात किचनमध्ये, बाथरुममध्ये, बेडरुममध्येही पाल सापडते.

घरात एकदा पाली झाल्या की त्यांना घराबाहेर काढणे हे फारच कठीण होऊन बसते. वेगवेगळे पर्याय करूनही पाल काही घरातून बाहेर जात नाही. अनेकजण काही स्प्रे, घरात ठेवण्यासाठी गोळ्याही आणतात. परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही.

संपूर्ण घरात किचनमध्ये पाली खूप आढळतात. त्यांची विष्ठा अन्नात पडण्याचा धोका असतो. त्यामुळेच तुम्ही काही घरगुती उपाय केले तर घरातील पाली पळून जातील. विशेष म्हणजे हा उपाय करून पाहण्यासाठी तुम्हाला पैसेही खर्च करावे लागणार नाहीत.

प्रत्येकाच्याच किचनमध्ये लसूण असतो. या लसणाच्या मदतीने तुम्ही घरातील पालींना पळवून लावू शकता. लसूण असला की भाजीला वेगळीच चव लागते. पण लसणाचा वास पालींना आवडत नाही. लसणामध्ये सल्फर असते. सल्फरचा वास पालींना आवडत नाही. झाडाची कुंडी किंवा खिडकीत लसणाच्या पाकळ्या ठेवल्या तर किचनमध्ये पाली येत नाहीत. हा प्रयोग तुम्हीही करून पाहू शकता.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)