
घरात एकदा उंदीर जाला की त्यापासून सुटका करून घेणे फारच अवघड होऊन बसते. हेच उंदीर घरातल्या सामानाची नासधूस करून टाकतात. पण घरातल्या उंदरांपासून सुटका करून घ्यायची असेल तर काही घरगुती उपाय करता येऊ शकतात.

उंदरांना लसणाचा वास आवडत नाही. त्यामुळे घरात जिथे जास्त उंदीर झालेले असतील तिथे लसणाचे पाणी शिंपडावे. किंवा तुम्ही लसणाचे तुकडेही जगोजागी ठेवू शकतो. यामुळे घरातील उंदीर पळून जाण्यास मदत होते.

उंदरांना कापूर आणि लवंग यांचाही गंध आवडत नाही. त्यामुळे कापूर आणि लवंग यांना जिथे उंदीर झालेले आहेत तिथे ठेवू शकता. यामुळे उंदीर पळून जाण्यास मदत होईल.

पिठ किंवा साखर यांच्यात बेकिंग सोडा मिसळल्यास आणि उंदरांना खायला ठेवल्यास ते घरातून पळून जातात. कारण उंदरांनी बेकिंग सोडा खाल्ला की त्यांचे पोट खराब होते. त्यामुळे हादेखील घरगुती उपाय चांगला ठरू शकतो.

तंबाखूच्या वासामुळेही उंदीर घरातून पळून जाण्यास मदत होते. बेसणाचे पीठ, तूप आणि तंबाखू यांचे मिश्रण करून त्याच्या गोळ्या उंदीर असलेल्या जागेवर ठेवू शकतात. याने घरातून उंदीर निघून जाण्यास मदत होते.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही यातील कोणत्याही माहितीचा दावा करत नाही किंवा समर्थनही देत नाही. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)