Kesar Plant : घरच्या कुंडीत फुलवा महागडं केशर! जाणून घ्या लागवडीची सोपी पद्धत आणि खास टिप्स

केशर हा जगातील महागड्या मसाल्यांपैकी एक आहे. पदार्थांना रंग आणि चव देण्यासाठी केशराचा वापर केला जातो. मात्र, योग्य कुंडी, माती, सूर्यप्रकाश आणि पाणी यांची काळजी घेतल्यास तुम्ही घरच्या घरी केशराचे रोप लावू शकता.

| Updated on: Nov 19, 2026 | 4:35 PM
1 / 5
केशराचे रोप बियांपासून नव्हे, तर कॉर्म म्हणजेच बल्बपासून तयार होते. हे कॉर्म तुम्हाला चांगल्या नर्सरी किंवा गार्डनिंग स्टोअरमध्ये मिळू शकतात. खरेदी करताना ते आकाराने मोठे, कडक आणि निरोगी असल्याची खात्री करा.

केशराचे रोप बियांपासून नव्हे, तर कॉर्म म्हणजेच बल्बपासून तयार होते. हे कॉर्म तुम्हाला चांगल्या नर्सरी किंवा गार्डनिंग स्टोअरमध्ये मिळू शकतात. खरेदी करताना ते आकाराने मोठे, कडक आणि निरोगी असल्याची खात्री करा.

2 / 5

केशर लावण्यासाठी कमीत कमी 10 ते 12 इंच खोल कुंडी निवडा. कुंडीच्या तळाशी पाणी बाहेर जाण्यासाठी छिद्रे असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही मातीची, प्लास्टिकची किंवा सिरॅमिकची कुंडी वापरू शकता.

3 / 5

केशराच्या चांगल्या वाढीसाठी पाण्याचा निचरा होणारी माती आवश्यक असते. यासाठी मातीत जाड वाळू आणि कुजलेले सेंद्रिय खत मिसळा. त्यामुळे कॉर्म सडण्याचा धोका कमी होतो.

4 / 5

सर्वप्रथम कुंडीत 4 ते 5 इंच माती भरा आणि कॉर्मचा टोकदार भाग वरच्या दिशेने ठेवा. दोन कॉर्ममध्ये साधारण 4 इंच अंतर ठेवा. त्यानंतर माती टाकून हलके पाणी द्या.

5 / 5

केशराच्या रोपाला चांगला सूर्यप्रकाश आणि मोकळी जागा आवश्यक असते. त्यामुळे कुंडी बाल्कनीत, गच्चीवर किंवा सूर्यप्रकाश येणाऱ्या खिडकीजवळ ठेवा. रोपाला हलके पाणी द्या, मात्र कुंडीत पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us