पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या मुस्लीम देशाने भारताला व्हिसा फ्री एन्ट्री नाकारली, पाहा कोणता देश
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या देशाने येत्या १ जानेवारी २०२७ पासून भारताला व्हिसा फ्री एन्ट्री नाकारली, पाहा हा कोणता देश आहे.

मलेशिया हा देश आशियातील लोकांचा सर्वात आवडता हॉलिडे डेस्टीनेशन पैकी एक आहे. आतापर्यंत भारतीय नागरिकांना तेथे व्हिसा फ्री एन्ट्री मिळत होती. मात्र, तुम्ही पुढच्या वर्षी २०२७ मध्ये मलेशियाला फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. मलेशियाने भारतीयांना मिळणारी व्हिसा फ्री एण्ट्री सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम १ जानेवारी २०२७ पासून लागू होणार आहे. त्यामुळे मलेशियाला जाणाऱ्या भारतीयांना व्हिसा घेणे अनिवार्य होणार आहे. चला या संदर्भात माहिती घेऊयात….
केव्हा आणि कसा कराल व्हिसासाठी अर्ज
मलेशियाच्या इमिग्रेशन डिपोर्टमेंटने १७ नोव्हेंबर रोजी एक ऑफीशियल नोटीस जारी करुन सांगितले की पुढच्या वर्षांच्या सुरुवातीपासून भारतीयांसाठी व्हिसा – फ्री एंण्ट्रीची सुविधा संपणार आहे. या नोटिसीच्या मते १ जानेवाी २०२७ वा त्यानंतर मलेशियात प्रवेश करणाऱ्यांना प्रत्येक भारतीय नागरिकाच्याजवळ व्हिसा बिफॉर अरायवल असायला हवे.
नवीन नियम लागू होण्याच्या आधी प्रवाशांच्या सुविधेसाठी व्हिसा एप्लिकेशन प्रोसेस लवकरच सुरु करण्यात येत आहे. भारतीय नागरिक १ डिसेंबर २०२६ पासून MyVISA ऑनलाइन पोर्टलद्वारे मलेशियाच्या व्हिसासाठी अर्ज करु शकतात.
अपूर्ण अर्जांवर कारवाई
मलेशियाच्या इमिग्रेशन विभागाने अपूर्ण वा पेंडिंग व्हिसा अर्जांसाठी एक नवा नियम जारी केला आहे. जर कोणता अर्ज ७ वर्किंग डेजपर्यंत न्यू एप्लिकेशन वा पेंडिंग पेमेंटमध्ये पडून राहिला असेल तर तो अर्ज स्वत:हून रद्दबातल होईल आणि पुन्हा अर्ज करण्यासाठी सुरुवातीपासूनची प्रक्रिया फॉलो करावी लागणार आहे. हा नियम १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू झाला आहे. आणि १ सप्टेंबर २०२६ पासून आधी जमा झालेल्या एप्लिकेशनवर देखील लागू होणार आहे.
व्हिसा फी रिर्टन होणार नाही
या नियमासह मलेशियाच्या इमिग्रेशन विभागाने हे देखील स्पष्ट केले आहे की व्हिसा प्रोसेसिंग फीज नॉन-रिफंडेबल आहे,म्हणजे ती कोणत्याही स्थितीत परत केली जाणार नाही. मग तुमचा व्हिसा मंजूर होवो किंवा फेटाळला जावो. फी पुन्हा परत मिळणार नाही. याशिवाय कोणत्याही पॉलिसी चेंज वा ट्रॅव्हल प्लान चेंजच्या स्थितीही फी परत केली जाणार नाही.
व्हिसा आणि ट्रॅव्हल इंश्योरन्समध्ये बदल
व्हिसा -फ्री एंट्री रद्द करण्याच्या शिवाय मलेशियाने ट्रॅव्हल इंश्योरन्स संदर्भातही काही बदल केलेले आहेत. १ सप्टेंबर २०२६ पासून मलेशियाने ३१ देशांच्या नागरिकांसाठी मल्टीपल – एंट्री व्हिसा देखील मर्यादित केले आहे. आता हा व्हिसा केवळ बिझनस मेडिकल ट्रीटमेंट, वेडिंग टुरिझम आणि फ्लाय-एंड- क्रुझ प्रवाशांनाच दिली जात आहे.
याच्या शिवाय इमिग्रेशन विभागाने प्रवाशांनाही हे सांगितले आहे की मलेशियात आपल्या संपूर्ण ट्रीला कव्हर करणारा ट्रॅव्हल मेडिकल इंश्योरन्स जरुर घ्यावे. तसेच देशात मिळणारे उपचार आणि अन्य आरोग्य सेवांचा खर्च नॉन रेसिडेंट्सना स्वत: उचलावा लागणार आहे.
