Health And Apple : सफरचंदात केमिकल वापरलंय हे कसं ओळखायचं, या सोप्या ट्रिक्स जरुर वापरा

चांगले आरोग्य राहावे यासाठी सफरचंद खावे असे सांगितले जाते. मात्र अनेकदा केमिकलचा वापर करून सफरचंदांचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे नैसर्गिकरित्या पिकवलेले सफरचंद ओळखणे गरजेचे आहे.

| Updated on: Oct 29, 2025 | 8:52 PM
1 / 7
रोज एक सफरचंद खाल्ले तर डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही, असे म्हटले जाते. आहारतज्ज्ञ तसेच डॉक्टरदेखील सफरचंद खाण्याचा सल्ला देतात.

2 / 7
सफरचंदामध्ये कॅलरीज, कार्बोहायड्रेट, फायबर्स, व्हिटमीन सी अशी पोषक तत्वे असतात. सोबतच सफरचंदामध्ये पोटॅशिमयमही असते. त्यामुळेच आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी रोज एक सफरचंद खावे, असे सांगितले जाते. मात्र आजकाल अनेक रसायने वापरून उत्पन्न घेतलेले सफरचंद बाजारात पाहायला मिळतात.

3 / 7
केमिकलमिश्रीत सफरचंदांमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सरायनांचा वापर करून उत्पादन केलेले तसेच बनावट सफरचं वेगवेगळ्या पद्धतीने वापरले जाते.

4 / 7
एखादे सफरचंद फारच चकमदार वाटत असेल तर सावध व्हायला हवे. सफरचंद चमकत असेल तर त्यावर व्हॅक्स लावलेले असू शकते. कारण नैसर्गिकरित्या पिकलेले सफरचंद फारसे चमकदार नसतात.

5 / 7
सफरचंद खरेदी करताना त्याचा वास घ्यायला हवा. वेगळा वास येत असेल तर त्या सफरचंदाला केमिकल लावलेले असू शकते. नैसर्गिकरित्या पिकलेल्या सफरचंदाचा गोड गंध येतो.

6 / 7
नैसर्गिकरित्या पिकलेल्या सफरचंदांवर छोटे-मोठे डाग असू शकतात. मात्र बनावट आणि केमिकलच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या सफरचंद चकाकणारे, कुठेही डाग नसणारे दिसतात.

7 / 7
सफरचंद नैसर्गिकरित्या पिकवलेले आहे की नाही हे तपासण्यासाठी सफरचंद अर्धे कापावे आणि ते पाण्यात टाकावे. पाण्यात टाकलेले सपरचंद तरंगत असेल तर ते नैसर्गिकरित्या पिकलेले आहे असे मान्य करावे. सफरचंद पाण्यात बुडाले तर ते केमिकलच्या मदतीने पिकवलेले असू शकते.