Curry Leaves : घरच्या कुंडीत उगवेल भरपूर कढीपत्ता! मातीत फक्त तीन वस्तू मिसळा, रोप होईल हिरवेगार

करी पत्त्याचा वापर जेवणाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी केला जातो. तसेच केसांच्या काळजीसाठीही करी पत्त्याचा उपयोग होतो. त्यामुळे अनेकजण घरात करी पत्त्याचे रोप लावतात. मात्र, योग्य काळजी न घेतल्यास रोपाची वाढ खुंटते आणि नवीन पाने येत नाहीत. अशावेळी काही सोप्या टिप्सच्या मदतीने रोप घनदाट आणि हिरवेगार बनवता येते.

| Updated on: Nov 21, 2026 | 1:13 PM
1 / 5
करी पत्त्याच्या रोपासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी माती आवश्यक असते. यासाठी 50 टक्के माती, 30 टक्के शेणखत आणि 20 टक्के वाळू किंवा कोकोपीट एकत्र करा. यामुळे रोपाची मुळे निरोगी राहून वाढ चांगली होते.

करी पत्त्याच्या रोपासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी माती आवश्यक असते. यासाठी 50 टक्के माती, 30 टक्के शेणखत आणि 20 टक्के वाळू किंवा कोकोपीट एकत्र करा. यामुळे रोपाची मुळे निरोगी राहून वाढ चांगली होते.

2 / 5

करी पत्त्याचे रोप चांगले वाढण्यासाठी सूर्यप्रकाश महत्त्वाचा आहे. त्यामुळे रोप अशा ठिकाणी ठेवा, जिथे पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल. प्रकाश कमी मिळाल्यास रोपाची वाढ मंदावू शकते.

3 / 5

रोपाला नियमित पाणी देणे आवश्यक असले तरी अति पाणी देणे टाळा. पाणी देण्यापूर्वी कुंडीतील मातीचा वरचा थर तपासा. माती कोरडी असल्यासच पाणी द्या, अन्यथा मुळे सडण्याची शक्यता असते.

4 / 5

रोपावरील पिवळी पाने, सुकलेल्या फांद्या आणि मृत भाग काढून टाका. यामुळे रोपाची ऊर्जा वाचण्यास मदत होते. तसेच नवीन फांद्या आणि हिरवी पाने येण्यास प्रोत्साहन मिळते.

5 / 5

करी पत्त्याच्या रोपाची वाढ चांगली होण्यासाठी मोहरीच्या पेंडचा खत म्हणून वापर करू शकता. यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमसारखी पोषक तत्त्वे असतात. त्यामुळे रोपाला पोषण मिळण्यास आणि हिरवीगार पाने येण्यास मदत होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us