
मोबाईलचा वापर कमी करा. मोबाईल, वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आपल्याला सवय लावतात. आपण नकळत खूप वेळ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर घालवतो. मोबाईलच्या वापराने स्ट्रेस वाढतो. तणाव कमी करायचा असेल तर मोबाईल वापरण्यावर आळा घाला.

पाळीव प्राण्यांची थेरपी ही एक बेस्ट थेरपी असते. मांजर, कुत्रा, ससा, पक्षी घरात आपण पाळले की आपला स्ट्रेस कमी होतो. प्राण्यांशी आपण काहीही बोलू शकतो. प्राणी आपल्याबद्दल कुठल्याच प्रकारचं मत बनवत नाहीत. त्यामुळे नेहमी ज्या व्यक्ती तणावाखाली असतील त्यांना प्राणी पाळा असं सांगितलं जातं.

कॉफी, चहा, फ्रिजी ड्रिंक्स म्हणजे सोडा ड्रिंक्स, चॉकलेट तुमची झोप उडवू शकते. ज्या गोष्टींमध्ये कॅफिन असते त्या गोष्टी आपल्याला तणावात टाकतात. तणाव कमी करायचा असेल तर झोपायच्या वेळी या गोष्टी खाणे-पिणे टाळा.

झोप आणि मानसिक आरोग्य एकमेकांवर अवलंबून आहेत. चांगली झोप झाली की मानसिक आरोग्य चांगलं राहतं, चांगलं मानसिक आरोग्य असेल तर चांगली झोप येते. झोप झाली की मन शांत राहतं. झोपायची आणि उठायची वेळ ठरलेली असेल तर माणूस स्ट्रेस पासून दूर राहतो.

तणावाशी लढण्यासाठी बेस्ट उपाय आहे व्यायाम! व्यायाम केल्याने ताणतणाव कमी होतो. आठवड्यातून तीनदा व्यायाम करायला हवा. तणावाशी लढण्यासाठी व्यायाम हा चांगला उपाय आहे. व्यायाम मेंदूला अधिक डोपामाइन, सेरोटोनिन आणि एंडोर्फिन तयार करण्यास मदत करते ज्यामुळे स्ट्रेस कमी होतो.