
तुमचे विचार लिहा: तुमचे मन शांत होण्यासाठी तुमचे विचार कागदावर लिहायला सुरुवात करा. तुम्ही काय विचार केले, तुम्ही का विचार केले आणि अनावश्यक विचार कसे टाळता येतील हे लिहा. यामुळे ही समस्या सुटेल.

शारीरिक हालचाली वाढवा: सकाळी चालणे, योगासने, डान्स, सायकलिंग, जिम, तुम्हाला जे आवडते ते करा. शारीरिक हालचाली वाढवल्याने एंडोर्फिन बाहेर पडतात, जे मन शांत आणि आनंदी ठेवतात. त्यामुळे अतिविचार थांबतात.

विचार करण्याची वेळ ठरवा: दिवसभर तुमच्या मनावर ताण येऊ नये म्हणून, विचार करण्यासाठी दिवसातीस 20 मिनिटे द्या. इरत वेली जर एखादा विचार मनात आला तर तो लिहून ठेवा, त्याचवेळी विचार करणे टाळा.

स्वत:ला व्यस्त ठेवा: चित्रकला, लेखन, बागकाम, स्वयंपाक अशी तुम्हाला व्यस्त ठेवणारी आणि आवडणारी कामे करा अशा कामांमुळे मन सकारात्मक राहते व मनात विचार येत नाहीत.

परफेक्ट गोष्टींचा नाद सोडा: आपल्याला सर्वकाही परिपूर्णपणे करायचे आहे हा विचार सोडा, यामुळे मानसिक ताण निर्माण होतो, ज्यामुळे अतिविचार मनात येतो. चुका स्वीकारा आणि त्याबद्दल विचार करणे टाळा.