YouTube : प्ले बटन मिळाल्यावर पैशांचा पाऊस पडतो का? युट्यूबचा नियम काय आहे?

युट्यूबच्या माध्यमातून आजकाल लोक लाखो रुपये कमवत आहेत. आज कन्टेंट क्रिएट करणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे. विशेष म्हणजे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. चांगली कामगिरी करणाऱ्यांना यूट्यूब प्ले बटन देते.

| Updated on: Dec 11, 2025 | 5:57 PM
1 / 5
आजकाल यूट्यूब हे फक्त मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही. यूट्यूबच्या माध्यमातून आजघडीला हजारो कन्टेंट क्रिएटर लाखो, कोट्यवधी रुपये कमवत आहेत. त्यामुळेच आता प्रत्येकजण एन्फ्लुएन्सर होण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो. जे कन्टेंट क्रिएटर चांगल्या पद्धतीचे कन्टेंट क्रिएट करतात त्यांना यूट्यूबकडून वेगवेगळे प्ले बटन दिले जातात.

2 / 5
प्ले बटन देऊन अशा कन्टेंट क्रिएटर्सना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न युट्यूबकडून केला जातो. त्यामुळे हे प्ले बटन मिळाले तर यूट्यूबर्सच्या कमाईत काही फरक पडतो का? असे विचारले जाते. याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ या...

3 / 5
सबस्क्रायबर्सचा एक निश्चित टप्पा पार केला की युट्यूबकडून क्रिएटर्सना वेगवेगळे प्ले बटन दिले जातात. हा एका प्रकारचा पुरस्कारच आहे. एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले की यूट्ब सिल्व्हर बटन देते. त्यानंतर 10 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यास यूट्यूबकडून गोल्डन प्ले बटन दिले जाते.

4 / 5
एक कोटी सबस्क्रायबर्सचा टप्पा पार केला तर युट्यूब अशा क्रिएटरला तेट डायमंड प्ले बटन देते. त्यानंतर एखाद्या कन्टेंट क्रिएटरने पाच कोटी सबस्क्रायबर्सचा टप्पा पूर्ण केला तर त्याचा सन्मान कस्टम बटन देऊन केला जातो. यूट्यूबकडून एखादे प्ले बटन भेटले की त्या चॅनेलची लोकप्रियता वाढते. लोक ते चॅनेल अधिकाधिक पाहतात. व्ह्यूज वाढतात. त्यामुळे कन्टेंट क्रिएटरला त्यातून मिळणारे पैसेदेखील वाढतात.

5 / 5
एखादे प्ले बटन मिळाले की कन्टेंट क्रिएटरला मिळणाऱ्या स्पॉन्सरशीपमध्ये वाढ होते. सोबतच जाहिरातीही मिळतात. तसं पाहायचं झालं तर एखादे प्ले बटन भेटल्यावर युट्यूबकडून कोणतेही वेगळे पैसे दिले जात नाहीत. परंतु त्या-त्या चॅनेलची लोकप्रियता वाढते त्यामुळे मिळणारा रिव्हेन्यू वाढतो.