
बॉलिवुडचा सुपरस्टार हृतिक रोशन सुजैन खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर आयुष्यात पुढे गेला आहे. हृतिक आता सबा आजादला डेट करतोय. दोघांच्या वयात 11 वर्षांच अंतर आहे. सुंदर पर्यटनस्थळी फिरायला गेलेला हृतिक रोशन त्याच्या गर्लफ्रेंडसोबत रोमँटिक झाला.

नुकताच हृतिक रोशनची गर्लफ्रेंड आजादचा 39 वा वाढदिवस झाला. यावेळी त्याने आपल्या लेडी लववर भरपूर प्रेम व्यक्त केलं.

हृतिक रोशनने गर्लफ्रेंड सबासाठी मनाला स्पर्शून घेणारी एक पोस्ट लिहिली. यात हृतिकने गर्लफ्रेंडसोबत अनेक रोमँटिक फोटो शेअर केलेत.

फोटोंमध्ये सबा आणि हृतिक हे दोघे मजा-मस्ती करताना दिसतायत. दोघे खूप चिल मोडमध्ये दिसले. काही फोटोंमध्ये दोघे सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटताना दिसले.

गर्लफ्रेंड सबासाठी हृतिकने एका पोस्ट केलीय. त्यावर एक्स वाईट सुजैन खानने रिएक्ट केलय. सुजैनने कमेंट सेक्शनमध्ये सबाला विश करताना लिहिलं, 'हॅप्पी बर्थ डे डार्लिंग सबू'