
आपल्या करिअरमध्ये प्रत्येक कलाकार अनेक चित्रपट सोडतात. त्यामागे काही कारणं असू शकतात. स्क्रिप्ट, दुसऱ्या कामामध्ये बिझी किंवा आणखी काही. ऋतिक रोशनने सुद्धा आपल्या करिअरमध्ये अनेक मोठे चित्रपट नाकारले. यात एक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. जर, हा चित्रपट ऋतिकने केला असता, तर त्याच्या करिअरचा सगळा गेम बदलला असता. 75 कोटीमध्ये बनलेला हा चित्रपट कुठला आहे, ते जाणून घ्या.

या चित्रपटातला हिरो पाकिस्तानी स्पाई एजेंटच्या प्रेमात पडतो. आता अडचण ही असते की, तो स्वत: सुद्धा भारतीय एजेंट असतो. वेळबरोबर त्या दोघांना आपण प्रेमात पडलोय याची जाणीव होते. हा चित्रपट सर्वप्रथम 2012 साली रिलीज झालेला.

हो बरोबर आहे तुमचं गेस. हा सलमान खानचा Ek The Tiger चित्रपट आहे.यात त्याच्या अपोजिट कटरीना कैफ होती. 13 वर्षापूर्वी हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरलेला. YRF स्पाई यूनिवर्सचा हा पहिला चित्रपट खूप गाजलेला. सलमान-कतरिनाची जोडी हिट ठरलेली. या पिक्चर नंतर सलमान खानचा टायगर जिंदा है चित्रपट आला.तेच टायगर 3 सुद्धा रिलीज झालाय.

Ek The Tiger हा चित्रपट 75 कोटीच्या बजेटमध्ये तयार केलेला. जगभरात या चित्रपटाने 320 कोटींचा व्यवसाय केला. इंडियन ग्रॉस कलेक्शन 263 कोटी रुपये होतं. चित्रपटात खूप Action होती. गाणी सुद्धा सुपरहिट ठरलेली. रिलीज नंतर या चित्रपटाला 19 अवॉर्ड्स मिळालेले.

सलमान खानचा 'एक था टायगर' कबीर खानने डायरेक्ट केलेला. सलमानसोबत कटरीनाच्या जोडीला खूप प्रेम मिळालेलं. दोघे चित्रपटात ज्या पद्धतीने दिसलेले, वावरलेले त्याचं खूप कौतुक झालेलं. या चित्रपटानंतर सलमानला प्रत्येक ठिकाणी टायगर म्हणण्यास सुरुवात झालेली. या चित्रपटात सलमानच्या व्यक्तीरेखेच नाव टायगर होतं.