‘हम आपके हैं कौन’मध्ये सलमानसोबत दिसणारी ही अभिनेत्री आता कशी दिसते? फोटो पाहून म्हणाल…

'हम आपके हैं कौन' चित्रपटात सलमान खानसोबत दिसणारी ही प्रसिद्ध अभिनेत्री आता कशी दिसते. फोटो पाहून विश्वास बसणार नाही. कोण आहे ती अभिनेत्री?

| Updated on: Mar 28, 2026 | 12:05 PM
1 / 5
चित्रपटसृष्टीत काही कलाकार असे असतात ज्यांच्या एका खास भूमिकेमुळे ते कायमस्वरूपी प्रेक्षकांच्या मनात घर करतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे. जिने अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम करूनही एका चित्रपटाने त्यांच्या कारकिर्दीला असा टर्निंग पॉइंट दिला, ज्यामुळे त्यांची ओळखच बदलून गेली.

चित्रपटसृष्टीत काही कलाकार असे असतात ज्यांच्या एका खास भूमिकेमुळे ते कायमस्वरूपी प्रेक्षकांच्या मनात घर करतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे. जिने अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम करूनही एका चित्रपटाने त्यांच्या कारकिर्दीला असा टर्निंग पॉइंट दिला, ज्यामुळे त्यांची ओळखच बदलून गेली.

2 / 5

27 मार्च 1965 रोजी मुंबईत जन्मलेल्या रेणुका शहाणे या मराठी कुटुंबातून येतात. त्यांचे वडील भारतीय नौदलात अधिकारी होते. लहानपणापासूनच त्यांना कलात्मक वातावरण लाभले. मात्र त्यांचे बालपण सोपे नव्हते. त्यांच्या लहान वयातच आई-वडिलांचा घटस्फोट झाला. ज्याचा त्यांच्या आयुष्यावर परिणाम झाला.

3 / 5

अडचणी असूनही त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यांनी सायकोलॉजीमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. अभिनय क्षेत्रात त्यांनी मराठी चित्रपट ‘हाच सुनबाईचा भाऊ’ मधून पदार्पण केले. 1994 साली त्यांच्या कारकिर्दीला मोठे वळण मिळाले, जेव्हा त्यांना 'हम आपके हैं कौन' या सुपरहिट चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

4 / 5

या चित्रपटात सलमान खान आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात रेणुकांनी ‘पूजा’ ही सोज्वळ, आदर्श सून आणि प्रेमळ बहीण अशी भूमिका साकारली. त्यांच्या साध्या आणि भावनिक अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. या एका चित्रपटामुळे त्यांना इतकी लोकप्रियता मिळाली की लोक त्यांना खऱ्या आयुष्यातही त्याच भूमिकेत पाहू लागले.

5 / 5

त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर 25 मे 2001 रोजी त्यांनी अभिनेता आशुतोष राणा यांच्याशी विवाह केला. या दांपत्याला शौर्यमन आणि सत्येंद्र अशी दोन मुले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us