
टीम इंडियाचा स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव याने आपल्या 360० स्टाईल बॅटींगने सर्वांची मने जिंकली आहेत. फक्त आयपीएलमध्ये नाहीतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही सूर्याने आपला दांडपट्टा सुरू ठेवला.

सुर्यकुमार यादव याने आपली टी-20 करियरमधील पहिल्या सामन्यातही षटकार मारत सुरूवात केली होती. इंग्लंडच्या जोफ्रा आर्चर याला सूर्याने षटकार मारला होता.

टीम इंडियाच्या प्रमुख खेळाडूंमध्ये सूर्यकुमार यादव याचा समावेश होतो. सूर्याने आतापर्यंत अनेक सामन्यात एकतर्फी विजय मिळवून दिले आहेत. सुर्यकुमार यादव याने आता झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भव्यदिव्य अशी कामगिरी नाही केली. फक्त एका कॅचमुळे तो कायम सर्वांच्या लक्षात राहणार आहे.

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून खेळताना त्याला फलंदाजीमध्ये खास काही करता आलं नाही. त्यामुळे आयसीसीने जाहीर केलेल्या रंँकिंगच्या ताज्या यादीमध्ये त्याला फटका बसला आहे.

सुर्यकुमार यादव याची एका स्थानाने घसरण झाली असून 821 अंकांसह दुसऱ्या स्थानी फेकला गेला आहे. तर पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया संघाचा ट्रॅव्हिस हेड 844 अंकांसह पहिल्या स्थानावर गेला आहे.