Ikkis Starcast Fees : धर्मेंद्र यांना शेवटच्या चित्रपटासाठी किती मिळालं मानधन?

'इक्कीस' या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट अनेक कारणांमुळे खास आहे. सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे हा धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट आहे. त्यांना अखेरचं मोठ्या पडद्यावर पाहून प्रेक्षक नक्कीच भावूक होतील.

| Updated on: Dec 30, 2025 | 7:46 PM
1 / 5
परमवीर चक्र विजेते अरुण खेत्रपाल यांच्या कथेवर आधारित 'इक्किस' हा चित्रपट येत्या 1 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचा हा शेवटचा चित्रपट आहे. त्याचसोबत यामध्ये अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, अभिनेत्री सिमर भाटिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.

2 / 5
या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. 'इक्कीस'मधील मुख्य भूमिकेसाठी त्याला फक्त 70 लाख रुपये मानधन मिळालं आहे. अगस्त्यने याआधी 'द आर्चीस'मध्येही काम केलं होतं. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.

3 / 5
'इक्कीस' या चित्रपटात अगस्त्यसोबत अभिनेत्री सिमर भाटिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिमरला या भूमिकेसाठी 5 लाख रुपये मानधन मिळाल्याचं कळतंय. सिमर ही अक्षय कुमारची भाची आहे.

4 / 5
बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक जयदीप अहलावत 'इक्कीस' या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी त्याला 50 लाख रुपये मानधन मिळाल्याचं वृत्त आहे.

5 / 5
'अंधाधुन', 'बदलापूर' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये अभिनेते धर्मेंद्र यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. परंतु या भूमिकेसाठी त्यांना फारसं मानधन मिळालं नाही. त्यांना 20 लाख रुपये मानधन मिळाल्याचं कळतंय.