कुठं उष्णतेचा रेड अलर्ट तर कुठे पावसाच्या सरी, 25 मे रोजी राज्याचे हवामान कसे? वाचा सविस्तर!

महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसणार आहेत. तर काही ठिकाणी कडाक्याचे उन पडणार आहे. राज्यात कुठे पाऊस पडण्याची शक्यता आहे, ते जाणून घेऊ या...

| Updated on: May 24, 2026 | 9:40 PM
1 / 5
सध्या वातावरणात अनेक बदल घडत आहेत. कुठे कडक ऊन पडत आहे तर कुठे मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी तर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. त्यामुळे 25 मे रोजी हवामान कसे असेल, ते जाणून घेऊ या...

सध्या वातावरणात अनेक बदल घडत आहेत. कुठे कडक ऊन पडत आहे तर कुठे मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी तर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. त्यामुळे 25 मे रोजी हवामान कसे असेल, ते जाणून घेऊ या...

2 / 5

सोमवारी म्हणजेच 25 मे रोजी काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसरणार आहे. अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

3 / 5

दुसरीकडे गोंदिया, नागपूर, यवतमाळ, अकोला, भंडारा आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

4 / 5

दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातल काही जिल्ह्यामध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. म्हणूनचसो सोलापूर, बीड, लातूर, धाराशीव, पुणे, अहिल्यानगर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

5 / 5

या काळात ज्या ठिकाणी पावसाच्या सरी बरसरणार आहेत, त्या भागात नागरिकांनी घरांची डागडुजी करावी. पाऊस आल्यानंतर झाडाखाली बसू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व तयारी करावी, असेही सांगितले जात आहे.

Follow Us