शनी, राहू-केतूचा दोष दूर करायचा, मग उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी…

उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी पाजण्याचे धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय आहे? शनी आणि राहू दोष दूर करण्यासाठी हा छोटा उपाय कसा फायदेशीर ठरू शकतो, याची सविस्तर माहिती.

| Updated on: Apr 24, 2026 | 3:24 PM
1 / 7
सध्या उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. घामाच्या धारा आणि अंगाची लाहीलाही होत असताना मानवाप्रमाणेच पशू-पक्षांचेही हाल होताना दिसतात. अनेकदा पाण्यासाठी भटकंती करताना पक्षांचे हाल होतात.

सध्या उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. घामाच्या धारा आणि अंगाची लाहीलाही होत असताना मानवाप्रमाणेच पशू-पक्षांचेही हाल होताना दिसतात. अनेकदा पाण्यासाठी भटकंती करताना पक्षांचे हाल होतात.

2 / 7

हिंदू धर्म आणि शास्त्रानुसार, उन्हाळ्यात तहानलेल्या पक्ष्यांची तहान भागवणे हे केवळ पुण्याचं काम नसून, त्यामुळे तुमच्या कुंडलीतील अनेक मोठे दोष दूर होऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार, घराच्या छतावर किंवा बाल्कनीत पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केल्याने कुंडलीतील शनी, राहू आणि केतू या ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात.

3 / 7

पक्ष्यांना दाणा-पाणी दिल्याने पितृदोषही शांत होतो, अशी धार्मिक मान्यता आहे. जर तुमच्या कामात सतत अडथळे येत असतील, तर पक्ष्यांची सेवा केल्याने भाग्योदय होतो. ज्या घराच्या अंगणात पक्ष्यांचा किलबिलाट असतो, तिथे सकारात्मक ऊर्जा वास करते.

4 / 7

पक्ष्यांना पाणी पाजल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. यामुळे व्यवसायात प्रगती होते. तसेच नोकरीत येणाऱ्या अडचणी दूर होतात. पक्षांसाठी पाणी ठेवताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. पक्ष्यांसाठी शक्यतो मातीचे भांडे वापरावे. मातीच्या भांड्यातील पाणी नैसर्गिकरित्या थंड राहते.

5 / 7

पाण्याचे भांडे अशा ठिकाणी ठेवा जिथे मांजर किंवा इतर प्राण्यांपासून पक्ष्यांना धोका नसेल. सावलीच्या ठिकाणी पाणी ठेवणे अधिक उत्तम. पक्ष्यांच्या भांड्यातील पाणी दररोज बदलावे. अस्वच्छ पाण्यामुळे पक्ष्यांना आजार होऊ शकतात, म्हणून दररोज भांडे घासून स्वच्छ करावे.

6 / 7

पाण्यासोबतच ज्वारी, बाजरी किंवा तांदूळ यांसारखी धान्ये एका बाजूला ठेवल्यास पक्ष्यांची अन्नाची गरजही पूर्ण होईल. आपल्या संस्कृतीत 'भूतदया' हाच सर्वात मोठा धर्म मानला गेला आहे. या कडक उन्हात एका मटक्यात पाणी ठेवून आपण अनेक मूक जीवांचे प्राण वाचवू शकतो.

7 / 7

water for birds 1

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us