डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्याने स्वतःलाच नांगराला जुंपले,कुठे घडला धक्कादायक प्रकार ?

मध्य पूर्वेतील संकटाची झळ जगाला बसत आहे. २८ फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या इराण युद्धाचा फटका जगाला बसत आहे. बुलढाण्यात डिझेल तुटवड्यामुळे शेतातील पेरणी पूर्वीची कोळपणी आणि मशागतीची कामे रखडली आहे. संग्रामपूर तालुक्यात डिझेल नसल्याने टॅक्टर अभावी एका शेतकऱ्याने स्वत:ला नांगराला जुंपल्याचा प्रकार घडला आहे.

| Updated on: May 16, 2026 | 6:31 PM
1 / 5
 इराण युद्धानंतर जगभर इंधनाचा तुटवडा भासत आहे.  बुलढाणा जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवरही इंधनाचा तुटवडा भासत असल्याचा फटका आता शेतकऱ्यांना बसत आहे.

2 / 5
 बुलढाणा येथील संग्रामपूर तालुक्यात ही हीच परिस्थिती आहे. डिझेल अभावी शेतातील कामांसाठी ट्रॅक्टर चालवता येत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.

3 / 5
 ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्याने युवा शेतकरी विशाल मुरुख याने स्वतः लाच वखरला जुंपल्याचा प्रकार घडला आहे.  शेतात वखर चालविणे सुरू केले आणि शेताची मशागत सुरू केली आहे.

4 / 5
 युवा शेतकरी विशाल मुरूख यांची सहा एकर शेती असून त्यांना पेरणीपूर्व शेतीची मशागत करायची आहे. तसेच कपाशी लागवड करायची आहे. मात्र ट्रॅक्टरसाठी पंपावर डिझेल मिळत नसल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे.

5 / 5
 सरकारने लवकरात लवकर डिझेल उपलब्ध करुन द्यावे आणि शेतकऱ्यांची अडचण दूर करावी अशी मागणी शेतकरी विशाल मुरुख यांनी टीव्ही ९ मराठीचे प्रतिनिधी गणेश सोळंकी यांच्याशी बोलताना केली आहे.

Follow Us