
कोल्हापूरच्या सैनिक टाकळी परिसरातील प्रशांत शंकर गुरव यांच्याकडे 'सर्जा' नावाचे बोकड आहे.या बोकडाच्या शरीरावर विशेष चिन्हं आहेत. ही बातमी पसरल्याने मुस्लिम बांधवांसह इतर धर्मीय लोक या सर्जा बोकडाला पाहण्यासाठी एकच गर्दी करीत आहेत.

बकरी ईदच्या या बोकडाच्या उजव्या कानावर 'अल्लाह' आणि 'मोहम्मद' ही दोन नावे जन्मतःच असल्याचं त्याचे मालक प्रशांत गुरव यांचे म्हणणे आहे.

बोकडाच्या कानावर असलेल्या या नावामुळेच मालकाने त्याची किंमत तब्बल २५ लाख ठेवली आहे. सर्जाच्या विक्रीच्या पैशांमधून आर्थिक उत्पन्न मिळणार असल्याचे बोकड मालक प्रशांत गुरव यांनी

ज्या बकऱ्याच्या अंगावर चंद्रकोर किंवा अल्लाह, मोहम्मद किंवा 786 असे काहीतरी विशेष चिन्हं असते. त्यांना बकरी ईदच्या काळात जास्त मागणी असते.

बकरी ईदनिमित्त मुस्लिम धर्मीय लोक अशा विशेष बोकडांना मोठी किंमत देऊन खरेदी करतात.या बोकडाच्या कानावर जन्मत: अल्लाह आणि मोहम्मद असे चिन्ह असेल तर अशा बोकडांवर मोठी बोली लागण्याची आशा प्रशांत गुरव यांना आहे.