
आता प्रश्न असा निर्माण होतो की, Ice Cream चा शोध कोणत्या देशाने लावला... तर चीन मध्ये Ice Cream चा शोध लागला... त्यामागील गोष्ट देखील प्रचंड रंजक आहे...

असा दावा केला जातो की, सुमारे 200 ईसापूर्वी चीनमध्ये दूध, तांदूळ, साखर आणि बर्फाचे मिश्रण तयार केले जात होते. हे Ice Cream चं मूळ मानले जायचे...

इटालियन प्रवासी मार्को पोलोने 13 ल्या शतकात चिनी Ice Cream रेसिपी इटलीत आणली, जिथे त्यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. मार्को पोलोने जेव्हा इटलीमध्ये Ice Cream आणलं तेव्हा त्याने Ice Cream ला नवीन रुप दिलं... त्यानंतर Ice Cream ला आधुनिक स्वरुप प्राप्त झालं.

त्यानंतर हळू हळू Ice Cream ची लोकप्रियता संपूर्ण युरोपमध्ये पसरली आणि 16 व्या शतकापर्यंत Ice Cream लोकप्रिय पदार्थ म्हणून ओळखीस आला. त्यानंतर इतर देशांमध्ये देखील Ice Cream ची निर्मिती होऊ लागली.

असा दावा केला जातो की 18 व्या शतकात Ice Cream अमेरिकेत पोहोतला आणि त्याचं व्यवसायिक उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरु झालं. आज भारतात देखील Ice Cream प्रचंड लोकप्रिय आहे.