
धन्याचा वापर जवळपास सर्वच भारतीय घरांमध्ये केला जातो. धनी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. भारतीय घरांमधील महत्वाचा मसाला धने आहे. जवळपास सर्वच भाज्यांमध्ये धन्यांचा समावेश असतो.

केवळ सुगंधी आणि चविष्टच नाही तर आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर धने असतात. विशेष म्हणजे धन्याचे पाणी अनेकजण वाढलेले वजन कमी करण्यासाठी पितात.

धन्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक सूक्ष्म पोषक घटक असतात. विशेष म्हणजे धने आतून शरीर साफ करण्यास मदत करतात.

बऱ्याच लोकांना पचनाची समस्या असते. जर तुम्हाला वारंवार गॅस, पोटफुगी, आम्लपित्त, अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर दिवसातून एकदा धन्याचे पाणी नक्की प्या.

धन्याचे पाणी पिल्याने आरोग्याच्या या समस्या दूर होतील. पचनाची समस्या ज्यांना आहे, त्यांच्यासाठी धने एक चांगलेच आैषधच आहे. नियमित हे पाणी पिल्याने समस्या दूर होतील.