IND VS SA: दक्षिण आफ्रिकेत ‘शतक’ टीम इंडियासाठी अपशकुन ठरतं का? सेंच्युरियनमध्ये काय घडणार
तुम्ही म्हणालं कसं काय ? खरंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा इतिहासच तसा आहे. ज्या-ज्यावेळी भारतीय फलंदाजांनी शतकी भागीदारी केलीय, त्या-त्या वेळी संघाचा पराभव झालाय.

- सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने दमदार प्रदर्शन केलं आहे. फक्त तीन विकेट गमावून 272 धावा केल्या आहेत. यात राहुलचे नाबाद शतक आणि मयांक अग्रवालच्या अर्धशतकाचा समावेश आहे. मयांक आणि राहुलच्या खेळीने मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने पाया रचला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 117 धावा केल्या.
- खरंतर मयांक आणि राहुलने शतकी भागीदारी रचली ही चांगली बाब आहे. पण त्यामुळे भारताच्या अडचणी सुद्धा वाढू शकतात. तुम्ही म्हणालं कसं काय ? खरंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा इतिहासच तसा आहे. ज्या-ज्यावेळी भारतीय फलंदाजांनी शतकी भागीदारी केलीय, त्या-त्या वेळी संघाचा पराभव झालाय.
- मयांक आणि राहुलच्या आधी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय सलामीवीरांच्या दोन जोड्यांनी शतकी भागीदारी केली आहे. 2006-07 मध्ये वसीम जाफर आणि दिनेश कार्तिकने ओपनिंगला येऊन 153 धावांची भागीदारी केली होती. 2010-11 मध्ये गंभीर-सेहवाग जोडीने पहिल्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी केली होती. या दोन्ही सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता.
- 2007 मध्ये जेव्हा जाफर-कार्तिक जोडीने शतकी भागीदारी केली, तेव्हा टीम इंडियाचा पाच विकेटने पराभव झाला होता. 2010-11 मध्ये टीम इंडियासाठी सलामीला शतकी भागीदारी होऊनही एक डाव आणि 85 धावांनी पराभव झाला होता.
- आता केएल राहुल आणि मयांक अग्रवालने पुन्हा एकदा शतकी भागीदारी केली आहे. त्यामुळे यावेळी इतिहास बदलणार का? हाच प्रश्न आहे. इतिहास बदलण्यासाठी भारतीय संघाला पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारुन चांगली गोलंदाजी करावी लागेल.





