भारत-पाकिस्तान सामन्यात टॉसवेळी मोठा गोंधळ! रेफ्रींना निर्णय बदलावा लागला; नेमकं काय घडलं?

IND A vs PAK A toss controversy: टॉसवेळी नेमका कोणाचा निर्णय बदलला? पाकिस्तानच्या कर्णधाराने नाणे तपासल्यानंतर रेफ्रींना आपली घोषणा बदलावी लागली. भारत-पाकिस्तान सामन्यातील हा गोंधळ चर्चेचा विषय ठरला.

| Updated on: Nov 22, 2026 | 5:24 PM
1 / 5
एसीसी मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यातील सामन्याच्या टॉसवेळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दोहा येथील वेस्ट एंड पार्क स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला.

एसीसी मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यातील सामन्याच्या टॉसवेळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दोहा येथील वेस्ट एंड पार्क स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला.

2 / 5

पाकिस्तान अचा कर्णधार अब्दुल समद याने टॉससाठी हेड्सची निवड केली होती. मात्र, नाणेफेकीनंतर मॅच रेफ्री नियामुर रशीद यांनी टेल्स आल्याचे जाहीर करत भारत अने टॉस जिंकल्याचे सांगितले.

3 / 5

रेफ्रींच्या निर्णयावर अब्दुल समद समाधानी नव्हता. त्यानंतर समद आणि भारत अचा कर्णधार तिलक वर्मा यांनी नाणे तपासले. समदने माइकवरून 'हे हेड्स आहे, हे हेड्स आहे' असे सांगितले. त्यानंतर रेफ्रींनी आपला निर्णय बदलला.

4 / 5

टॉसदरम्यान तिलक वर्मा आणि अब्दुल समद यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले नाही. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांमधील नो हँडशेकची भूमिका या सामन्यातही कायम राहिली.

5 / 5

अखेर पाकिस्तान अने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत अचा कर्णधार तिलक वर्मा यानेही टॉस जिंकला असता तर प्रथम फलंदाजी केली असती, असे सांगितले. दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us