मालदीवची पर्यटन कोंडी करण्यात भारताला यश; पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट
मालदीवच्या तीन उपमंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद टिप्पणीनंतर मालदीवची पर्यटन कोंडी करण्याचे सूर भारतातून उमटू लागले होते. त्यात भारताला बरंच यश मिळाल्याचं या आकडेवारीतून स्पष्ट दिसतंय.

मालदीव पर्यटन रँकिंगमध्ये भारत पहिल्या क्रमांकावरून थेट पाचव्या स्थानावर
Image Credit source: Facebook
- मालदीवला भारताशी पंगा घेणे चांगलेच महागात पडले आहे. आता मालदीवच्या पर्यटन मंत्रालयकडून डाटा समोर आला आहे. त्यानुसार भारतातून मालदीवमध्ये जाणाऱ्या पर्यंटकांची संख्या मागील वर्षांपेक्षा 33 टक्क्यांनी कमी झाली आहे.
- एकेकाळी भारतातून मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक होती. मात्र आता बॉयकॉटचा थेट परिणाम मालदीवच्या पर्यटनावर दिसून आला आहे. दुसरीकडे नवे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी चीनसमोर पर्यटक वाढवण्यासाठी हात पसरवले होते. यानंतर मालदीवला जाणाऱ्या चीनच्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याचं पहायला मिळतंय.
- मालदीवच्या पर्यटकांच्या संख्येत आतापर्यंत अग्रस्थानी होता. मात्र बॉयकॉटच्या मोहिमेनंतर भारत दुसऱ्या किंवा तिसऱ्या नव्हे तर थेट पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. तर पर्यटकांची संख्या वाढवल्यानंतरही चीन अद्याप तिसऱ्या स्थानावरच आहे. सोमवारी मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाकडून हे आकडे जाहीर करण्यात आले आहेत.
- या आकड्यांवरून हे स्पष्ट होतंय की मालदीवमध्ये 21 जानेवारी रोजी चिनी पर्यटकांची संख्या भारतीय पर्यटकांच्या तुलनेत अधिक होती. गेल्या वर्षी सर्वाधिक भारतीय मालदीवला फिरायला गेले होते. 2023 मध्ये 31 डिसेंबरपर्यंत मालदीवच्या पर्यटनात भारतीयांची भागीदारी 11.1 टक्के होती. यानंतर रशिया दुसऱ्या स्थानी तर 10 टक्क्यांच्या भागीदारीसह चीन तिसऱ्या स्थानी होता.
- त्यानंतर 3 जानेवारी रोजी जाहीर केलेल्या आकड्यांमध्ये चीन टॉप 10 मध्येसुद्धा सहभागी नव्हता. मात्र 13 जानेवारी 2024 पर्यंत भारत 8.1 टक्के भागीदारीसह तिसऱ्या स्थानी पोहोचला होता. त्यावेळी चीन सहाव्या स्थानी होता. मुइज्जू यांच्या बीजिंग दौऱ्यानंतर 21 जानेवारीपर्यंत चीन चौथ्या स्थानी पोहोचला आहे. आता 28 जानेवारीच्या डेटानुसार चीन 9.5 टक्क्यांच्या भागीदारीसह तिसऱ्या स्थानी आहे.





