
बिहार तसे गरीब राज्य म्हणून ओळखले जाते. पण या राज्यात सोन्याचा मोठा साठा आहे. जमूई जिल्ह्यातील सोने खाणीत देशातील एकूण सोन्याचा 44 टक्के वाटा आहे. 222.8 दशलक्ष टन सोने येथून येते.

राजस्थान राज्यात 125.9 दशलक्ष टन सोन्याचा साठा आहे. भुकिया-जगपुरा या खाणी बनस्वारा जिल्ह्यात आहेत. सर्वाधिक सोन्याचा साठा असलेले राजस्थान हे दुसरे राज्य आहे.

कर्नाटकमधील खाणीतून 103 दशलक्ष सोने उत्पादन होते. कोलर, धारवाड, हसन आणि रायचूर जिल्ह्यात सोन्याच्या खाणी आहेत. हुत्ती आणि कोलार या देशातील सर्वात गाजलेल्या सोने खाणी आहेत.

आंध्र प्रदेशाकडे 15 दशलक्ष टन सोन्याचा साठा आहे. रामगिरी ही सोन्याची खाण आहे. रायलसीमा भागात अजूनही सोन्याचा शोध सुरू आहे.

उत्तर प्रदेशात 13 दशलक्ष टन सोन्याचा साठा आहे. सोनभद्र जिल्ह्यातील खाणीत हा सोन्याचा साठा आहे.

पश्चिम बंगालकडे सोन्याचा 12 दशलक्ष टन साठा आहे. सोनापटा भागात हा सोन्याचा साठा आहे. येथे दुसरीकडेही सोन्याचा शोध सुरू आहे.

झारखंडकडे 10.08 दशलक्ष टन सोन्याचा साठा आहे. कुंदरकोचा या भागात सोने सापडते. अजूनही शोध मोहीम थांबलेली नाही.