IND vs WI: हर्षलच्या ‘त्या’ बॉलवर हिटिंग करणारा पॉवेल चकला आणि तिथेच….

भारताने सांघिक कामगिरीच्या बळावर विजय मिळवला, हे खरं आहे. पण हर्षल पटेलनं (Harshal patel) टाकलेलं ते शेवटचं षटक खूप मोलाचं ठरलं.

| Updated on: Feb 19, 2022 | 4:26 PM
1 / 5
भारत-वेस्ट इंडिजमधला दुसरा टी-20 सामना खूपच रोमांचक ठरला. भारताने वेस्ट इंडिजवर आठ धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्याने शेवटच्या षटकापर्यंत क्रिकेट चाहत्यांची उत्सुक्ता ताणून ठेवली.

2 / 5
भारताने सांघिक कामगिरीच्या बळावर विजय मिळवला, हे खरं आहे.  पण हर्षल पटेलनं टाकलेलं ते शेवटचं षटक खूप मोलाचं ठरलं. हर्षल पटेलने या सामन्यात चार षटकात 46 धावा दिल्या. एक विकेटही घेतला नाही. पण एका हुशार गोलंदाजाची चुणूक हर्षलमध्ये दिसली.

3 / 5
शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 25 धावांची गरज होती. रोहितने हर्षलकडे चेंडू सोपवला. समोर स्ट्राइकवर रोव्हमॅन पॉवेल (54) आणि नॉन स्ट्राइकवर कायरन पोलार्ड एक रन्सवर खेळत होता. पहिल्या दोन चेंडूत हर्षलने दोन धावा दिल्या. पण तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर पॉवेलने दोन षटकार ठोकले. त्यावेळी क्रिकेट चाहत्यांचं टेन्शन वाढलं होतं.

4 / 5
पॉवलची फलंदाजी पाहून पुढच्या दोन चेंडूंवरही तो सहज षटकार मारेल असं वाटत होतं. पण हर्षलने पाचवा बॉल स्लोअरवन टाकून पॉवेलला चकवलं. त्याला फक्त एक रन्स काढता आला. तिथेच सामना भारत जिंकणार हे स्पष्ट झालं. शेवटच्या चेंडूवर हर्षलने फक्त एक रन्स दिला. अशा प्रकारे भारताने हा सामना आठ धावांनी जिंकला.

5 / 5
वैविध्यपूर्ण गोलंदाजी हे हर्षल पटेलच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. त्याच्या भात्यात यॉर्कर, पासून स्लोअर वनपर्यंत वेगवेगळे चेंडू आहेत. गोलंदाजी करताना चेंडूच्या वेगात हर्षल अत्यंत सहजतेने बदल करतो.  तीच त्याची खरी ताकत आहे. त्यामुळेच हर्षलचा पुढचा चेंडू काय असेल? त्याचा फलंदाजाला लगेच अंदाज बांधता येत नाही. काल शेवटच्या षटकात हर्षलने अशाच प्रकारची गोलंदाजी केली.