Women Asia Cup Final : Women’s Asia Cup Final : भारत जिंकला अन् नक्वी ट्रॉफी द्यायला आले तर? हरमनप्रीत काय निर्णय घेणार, पुन्हा नवा पेच

Women Asia Cup Final : भारत आणि श्रीलंका यांच्यात महिला आशिया कपचा अंतिम सामना रंगणार आहे. मात्र सामन्यापेक्षा एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा सुरू झाली आहे. भारताने विजय मिळवल्यास ट्रॉफी कोणाच्या हातून स्वीकारली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

| Updated on: Sep 13, 2026 | 7:28 PM
1 / 5
भारत-श्रीलंका महिला आशिया कप फायनल
दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात महिला आशिया कपचा अंतिम सामना रंगणार असून, चाहत्यांमध्ये या सामन्याविषयी मोठी उत्सुकता आहे.

भारत-श्रीलंका महिला आशिया कप फायनल दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात महिला आशिया कपचा अंतिम सामना रंगणार असून, चाहत्यांमध्ये या सामन्याविषयी मोठी उत्सुकता आहे.

2 / 5

एशियन क्रिकेट कौन्सिलचे (ACC) अध्यक्ष मोहसीन नक्वी हे या अंतिम सामन्याला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्याच हस्ते विजेत्या संघाला ट्रॉफी दिली जाणार आहे.

3 / 5

जर भारतीय महिला संघाने विजय मिळवला, तर ट्रॉफीच्या वितरणावरून पुन्हा एकदा मोठा वाद किंवा ड्रामा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

4 / 5

मागील वर्षी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघाने आशिया कप जिंकला तेव्हा नक्वी यांच्या हातातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याने प्रेझेंटेशन सेरेमनी रखडली होती.

5 / 5

त्या ऐतिहासिक वादानंतर भारतीय संघाला अजूनही ती ट्रॉफी मिळालेली नसून, आज जिंकल्यास कर्णधार हरमनप्रीत कौर मोहसीन नक्वी यांच्या हातातून ट्रॉफी स्वीकारणार की नकार देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us