AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसने भाजपचा बडा नेता फोडला, आणखी काही पुढारी वाटेवर; सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं

कर्नाटकात भाजपला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकात केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा बडा नेता फुटला. कर्नाटकातील आणखी काही पुढारी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती हाती आली आहे.

काँग्रेसने भाजपचा बडा नेता फोडला, आणखी काही पुढारी वाटेवर; सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं
bjp newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 13, 2026 | 8:59 PM
Share

कर्नाटकाच्या राजकारणात मोठा फेरबदल झाला आहे. कर्नाटकात भाजपला मोठा हादरा बसला आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र बीके हरिप्रसाद यांनी मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नरेंद्र बीके हरिप्रसाद यांनी शनिवारीच भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचेही स्षष्ट केले होते. नरेंद्र हरिप्रसाद यांच्यानंतर आणखी काही नेते काँग्रेसच्या वाटेवर असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

कर्नाटकातील मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी म्हटलं की, फक्त नरेंद्र बीके हरिप्रसाद नव्हे, तर आणखी काही नेते काँग्रेसच्या संपर्कात आहेत. यात एक राष्ट्रीय राजकारणात सक्रिय असलेला नेत्याचाही समावेश आहे. तर काही जिल्हा पातळीवर काम करणारे नेते देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करू इच्छित आहेत. त्यांची लवकरच यादी तयार केली जाईल. जे लोक काँग्रेसची विचारधारा आणि पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात, त्यांना संधी दिली जाईल’.

कर्नाटकातील आणखी काही नेते काँग्रेसच्या वाटेवर 

शिवकुमार यांनी पुढे सांगितले की, राजकीय बदल फक्त नेत्यांपर्यंत मर्यादित ठेवायचा नाही. तर देशात युवक देखील महत्त्वाचे आहेत. ते भरपूर आशेने काँग्रेसकडे पाहत आहेत. युवकांनी भाजपला सलग 13 वर्ष संधी दिली. परंतु आता युवकांना काँग्रेसकडून अपेक्षा आहेत’. डीके शिवकुमार यांनीही तरुणांना काँग्रेसकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यावेळी त्यांनी नरेंद्र बाबू यांच्यानंतर आणखी काही नेते काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा दावा केला. काँग्रेसची विचारधारा मान्य असलेल्यांना पक्षात स्थान दिले जाईल, असे शिवकुमार यांनी स्पष्ट केले.

भाजप का सोडली?

नरेंद्र बाबू हे कर्नाटकात भाजपच्या ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष होते. त्यांनी शनिवारी भाजप सोडण्याची घोषणा केली. पक्षाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत नरेंद्र बाबू यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. खरंतर त्यांनी आधीच 13 सप्टेंबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आज रविवारी मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करत, आता यापुढे काँग्रेससाठीच काम करणार असल्याचे स्पष्ट केले.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच