Army Chopper Crash Ooty | लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, तामिळनाडूतील घटनेत 4 जणांचे मृतदेह हाती

| Updated on: Dec 08, 2021 | 2:53 PM

तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे. या हेलिकॉप्टरमधील दोन जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या वेलिंग्टन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

1 / 9
तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे. या हेलिकॉप्टरमधील दोन जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या वेलिंग्टन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या अपघातात  4 जणांचे मृतदेह हाती आले आहेत.

2 / 9
या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे बडे अधिकारी होते. त्यांचा तपास सुरू आहे. सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat), त्यांची पत्नी, पायलट आणखी एक व्यक्ती त्या हेलिकॉप्टरमधून (Chopper Crash) प्रवास करत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

3 / 9
तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये ही दुर्घटना घडली. तामिळनाडूतन गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरू आहे. त्यामुळे खराब वातावरणामुळे ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे.

4 / 9
समोर आलेल्या माहितीनुसार बिपीन रावत हे पत्नीसह उटीला एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जात होते. मात्र, कुन्नूरच्या घनदाट अरण्यात ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेवर लष्कराकडून अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही.

5 / 9
16 मार्च 1958मध्ये बिपीन रावत यांचा जन्म झाला. त्यांचे वडील एलएस रावत सैन्यात होते.बिपिन रावत (Bipin Rawat) हे देशातील पहिले CDS अधिकारी म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत.

6 / 9
 बिपीन रावत संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी एक आहेत. ते निवृत्त होण्यापूर्वी नरेंद्र मोदी सरकारनं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची निर्मिती करुन त्यांना त्यापदावर काम करण्यासाठी संधी दिली होती.

7 / 9
बिपिन रावत अमेरिकेतून परतले आणि त्यानंतर त्यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रयत्नांना 16 डिसेंबर 1978 रोजी यश मिळाले.त्यांना गोरखा 11 रायफल्सच्या 5व्या बटालियनमध्ये सामील करण्यात आलं.

8 / 9
त्यांनी लष्कराची धोरणं समजून घेतली आणि धोरणं तयार करण्याचं कामही केलं. इथं त्यांनी लष्कराच्या अनेक पदांवर क्रॉप्स, जीओसी-सी, दक्षिण कमांड, आयएमए देहरादून, लष्करी ऑपरेशन्स डायरेक्टोरेट लॉजिस्टिक्स स्टाफ ऑफिसर अशा विविध पदांवर काम केलं.

9 / 9
जनरल रावत यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आलं आहे.