खासदार-आमदारांचा राजेशाही थाट, चांदीच्या थाळीत भोजन; एका थाळीचे भाडे….

मुंबईत झालेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत, संसद आणि राज्य विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्यांना शाही भोजन दिले गेले. प्रत्येकी सदस्यांवर ४५०० रुपये खर्च झाले, ज्यामध्ये चांदीच्या ताटांचा समावेश होता. हे जनतेच्या पैशाचे अपव्यय असल्याचा आरोप होत आहे.

| Updated on: Jun 25, 2025 | 9:57 AM
1 / 8
संसद आणि राज्य विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठी मुंबईत दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

संसद आणि राज्य विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठी मुंबईत दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

2 / 8

या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या समारोपावेळी शाही भोजनाचा बेत करण्यात आला.

3 / 8

या भोजनासाठी एका खासदारावर किंवा आमदारावर तब्बल 4500 हजार रुपये खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे. ज्यामुळे राज्य निधीच्या उधळपट्टीचा आरोप होत आहे.

4 / 8

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या या परिषदेतील भोजन चांदीच्या ताटांमध्ये वाढण्यात आले होते. ज्यात विविध पंचपक्वान्नांचा समावेश होता.

5 / 8

धक्कादायक बाब म्हणजे, चांदीच्या एका थाळीचे भाडे ५५० रुपये होते. तर भोजनाचा खर्च चार हजार रुपये होता. म्हणजेच एका जेवणासाठी राज्य विधिमंडळाने एकूण ४, ५५० रुपये मोजले.

6 / 8

अर्थसंकल्पातील तरतुदींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काटकसरीच्या शिफारसी करण्याची जबाबदारी ज्या अंदाज समितीवर असते.

7 / 8

त्याच समितीच्या सदस्यांसाठी अशा प्रकारे चांदीच्या ताटात भोजन देऊन सार्वजनिक पैशांची उधळपट्टी केल्याबद्दल आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

8 / 8

एका बाजूला सर्वसामान्यांवर आर्थिक बोजा वाढत असताना, दुसरीकडे लोकप्रतिनिधींच्या जेवणावर इतका मोठा खर्च करणे कितपत योग्य आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us