AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; रोहित शर्माबाबत मोठा निर्णय

वेस्ट इंडिजविरूद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. वनडे मालिकेत रोहित शर्माच्या निवडीबाबत पेच होता. त्यामुळे या संघात आहे की नाही? याबाबत चर्चा होती. अखेर हा प्रश्न सुटला असून त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

IND vs WI: वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; रोहित शर्माबाबत मोठा निर्णय
| Updated on: Sep 16, 2026 | 9:38 PM
Share

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वेस्ट इंडिजविरुद्ध आगामी घरच्या मैदानावर होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी अधिकृतपणे भारतीय संघाची घोषणा केली आहे. 27 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी शुबमन गिलकडे कर्णधारपद आहे, तर स्टार फलंदाज श्रेयस अय्यर हा टी20 संघाचे नेतृत्व करताना दिसेल. रोहित शर्मा वनडे मालिकेत खेळणार की नाही? याबाबत चाहत्यांमध्ये सर्वात मोठी उत्सुकता होती. कारण त्याच्या निवडीबाबत बराच पेच निर्माण झाला होता. 2027 वनडे वर्ल्डकप संघाच्या बांधणीत बसत नसल्याचं बोललं जात होतं. पण निवड समितीने रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही ज्येष्ठ खेळाडूंना एकदिवसीय संघात कायम ठेवले आहे. त्यामुळे आगामी 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या रणनीतीचा भाग असतील असं जाणकारांचं म्हणणं आहे.

जुलै 2026 मध्ये झालेल्या इंग्लंड दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मावर निवृत्तीचा आणि संघातून बाहेर पडण्याचा मोठा दबाव होता. मात्र, त्याने आपल्या बॅटने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम निर्णायक एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने 110 चेंडूंत 138 धावांची झंझावाती खेळी केली. लॉर्ड्सवरील याच शतकामुळे रोहितने आपले स्थान पुन्हा मजबूत केले आणि बीसीसीआयला त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे संघात कायम ठेवणे भाग पडले. दुसरीकडे, उपकर्णधार श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह हे स्टार खेळाडू या एकदिवसीय मालिकेत नाहीत. त्याला कारणही तसंच आहे. दोन्ही स्टार खेळाडू 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेणार आहे. वनडे मालिकेदरम्यान ही स्पर्धा असल्याने दोघंही वनडे संघाचा भाग नाहीत.

एकदिवसीय संघात ऋषभ पंतच्या निवडीवरही बरीच चर्चा रंगली होती. पण त्याला पुन्हा एकदा वगळण्यात आले आहे. पंतच्या जागेवर राखीव यष्टीरक्षक म्हणून ध्रुव जुरेलची निवड झाली आहे. इराणी चषकासाठी पंतला ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हार्दिक पांड्याचेही पुनरागमन झालेले नाही, त्यामुळे त्याच्या तंदुरुस्तीबद्दल शंका निर्माण झाली आहे. दरम्यान, वनडे संघात श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाडचे संघात पुनरागमन झाले आहे.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ: शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, रुतुराज गायकवाड, केएल राहुल (उपकर्णधार), ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, औकिब नबी, यशस्वी जयस्वाल, नमन धीर.

भारताचा टी20 संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर). तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, नीतीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयांक यादव.

भारत वेस्ट इंडिज सामन्यांचं वेळापत्रक

  • 1st ODI: 27 सप्टेंबर 2026 (रविवार) रोजी तिरुवनंतपुरम (Trivandrum) येथे दुपारी 2:00 वाजता खेळवला जाईल.
  • 2nd ODI: 30 सप्टेंबर 2026 (बुधवार) रोजी गुवाहाटी (Guwahati) येथे दुपारी 2:00 वाजता खेळवला जाईल.
  • 3rd ODI: 03 ऑक्टोबर 2026 (शनिवार) रोजी न्यू चंदीगड (New Chandigarh) येथे दुपारी 2:00 वाजता खेळवला जाईल.
  • 1st T20I: 06 ऑक्टोबर 2026 (मंगळवार) रोजी लखनऊ (Lucknow) येथे सायंकाळी 7:00 वाजता खेळवला जाईल.
  • 2nd T20I: 09 ऑक्टोबर 2026 (शुक्रवार) रोजी रांची (Ranchi) येथे सायंकाळी 7:00 वाजता खेळवला जाईल.
  • 3rd T20I: 11 ऑक्टोबर 2026 (रविवार) रोजी इंदूर (Indore) येथे सायंकाळी 7:00 वाजता खेळवला जाईल.
  • 4th T20I: 14 ऑक्टोबर 2026 (बुधवार) रोजी हैदराबाद (Hyderabad) येथे सायंकाळी 7:00 वाजता खेळवला जाईल.
  • 5th T20I: 17 ऑक्टोबर 2026 (शनिवार) रोजी बेंगळुरू (Bengaluru) येथे सायंकाळी 7:00 वाजता खेळवला जाईल.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता